राज कुंद्रा याचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:06 IST2021-09-19T04:06:36+5:302021-09-19T04:06:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पॉर्नोग्राफीक फिल्म्सप्रकरणी आरोपी असलेला व्यावसायिक राज कुंद्रा याने शनिवारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. ...

Raj Kundra's bail application in court | राज कुंद्रा याचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

राज कुंद्रा याचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पॉर्नोग्राफीक फिल्म्सप्रकरणी आरोपी असलेला व्यावसायिक राज कुंद्रा याने शनिवारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नसून आपल्याला ‘बळीचा बकरा’ बनविण्यात आल्याचे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे.

मुंबई गुन्हे अन्वेषण (मालमत्ता) विभागाने काहीच दिवसांपूर्वी कुंद्रा व अन्य तीनजणांवर पाॅर्नोग्राफीक चित्रपटांची निर्मिती करून वितरण केल्याबद्दल पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर आरोपींनी दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याने आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती आरोपींनी न्यायालयाला केली. तर आपल्याविरोधात आतापर्यंत एकही पुरावा तपास यंत्रणेकडे नसल्याचे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, आरोपी हॉटशॉट ॲपवर अश्लिल चित्रपट अपलोड करून ते वितरित करत होते.

Web Title: Raj Kundra's bail application in court