Join us

राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 06:11 IST

कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये राज आणि शिल्पा यांनी ‘बेस्ट डील टीव्ही’ या आपल्या कंपनीत गुंतवणुकीचे आमंत्रण दिले होते.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती व व्यावसायिक राज कुंद्रा यांची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल पाच तास कसून चौकशी करण्यात आली. एका खासगी वित्त संस्थेचे संचालक दीपक कोठारी यांनी केलेल्या ६०.४८ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपांवरून ही चौकशी झाली. राज कुंद्रा यांना पुढील आठवड्यात पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात येणार असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस

कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये राज आणि शिल्पा यांनी ‘बेस्ट डील टीव्ही’ या आपल्या कंपनीत गुंतवणुकीचे आमंत्रण दिले होते. या कंपनीत सुमारे ७५ कोटी रुपये गुंतवण्याची विनंती करताना त्यांनी नियमित परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून कोठारी यांनी दोन टप्प्यांत एकूण ६०.४८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीनंतर काही काळातच शिल्पा शेट्टी यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आणि कंपनी दिवाळखोरीत गेल्याचे कोठारी यांना समजले.

यासंदर्भात पैसे परत

मिळावेत म्हणून वारंवार प्रयत्न करूनही कुंद्रा दाम्पत्याने विविध कारणांनी वेळ लावला आणि पैसे परत न दिल्याचा आरोप कोठारी यांनी केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून जबाबांची पडताळणी

या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी करून राज आणि शिल्पा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

सोमवारी राज कुंद्रा चौकशीसाठी हजर राहिले. त्यांच्या जबाबांची सखोल पडताळणी केल्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा बोलावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :राज कुंद्रा