राज कुंद्राने तयार केले १०० हून अधिक पोर्न चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:06 IST2021-07-23T04:06:03+5:302021-07-23T04:06:03+5:30

सर्व्हर जप्त, गुन्हे शाखेकडून घर, कार्यालयात झाडाझडती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ...

Raj Kundra has made over 100 porn movies | राज कुंद्राने तयार केले १०० हून अधिक पोर्न चित्रपट

राज कुंद्राने तयार केले १०० हून अधिक पोर्न चित्रपट

सर्व्हर जप्त, गुन्हे शाखेकडून घर, कार्यालयात झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने आतापर्यंत १०० हून अधिक पोर्न चित्रपट तयार केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. तसेच त्याच्या, घर आणि कार्यालयात केलेल्या झाडाझडतीतून गुन्हे शाखेने सर्व्हर जप्त केला आहे. यात बरेचसे व्हिडिओ, मजकूर डिलिट केला असून तोदेखील मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.

गुन्हे शाखेने राज कुंद्रा याच्याकडून ॲपची माहिती असणारा सर्व्हर, ईमेल, व्हाॅट्सॲप चॅट, बँक खात्यांचे तपशील आणि काही व्हिडिओ जप्त केले आहेत. सर्व्हर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. राज कुंद्रा याच्या घरावर छापा टाकून काही दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत. आतापर्यंत ७० व्हिडिओ ताब्यात घेतले आहेत. यातील बऱ्याच गोष्टी त्याने डिलिटही केल्या आहेत. त्या देखील मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत शिल्पा शेट्टीचा सहभाग समोर आलेला नाही. मात्र, तिचाही यात काही संबंध आहे का? या दिशेनेही तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. शुक्रवारी कुंद्राची कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.

Web Title: Raj Kundra has made over 100 porn movies