वाड्यात कलाकारांच्या उपस्थितीत रंगली वर्षा मॅरेथॉन

By Admin | Updated: August 18, 2014 00:53 IST2014-08-18T00:53:08+5:302014-08-18T00:53:08+5:30

आॅगस्ट क्रांती वर्षा मॅरेथॉन २०१४ स्पर्धेत ठाणे पालघर जिल्हतील ग्रामीण भागातील साडेपाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

Rainy Marathon in the presence of artists in the castle | वाड्यात कलाकारांच्या उपस्थितीत रंगली वर्षा मॅरेथॉन

वाड्यात कलाकारांच्या उपस्थितीत रंगली वर्षा मॅरेथॉन

वाडा : वाडा तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या आॅगस्ट क्रांती वर्षा मॅरेथॉन २०१४ स्पर्धेत ठाणे पालघर जिल्हतील ग्रामीण भागातील साडेपाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विक्रमगड तालुक्यातील खांड येथील ज्ञानेश्वर मोरघा याने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपटू स्नेहल रजपूत व सिने कलाकार अरूण कदम, अभिजित चव्हाण व तारका मृणाली ठाकूर. येथील खंडेश्वरी नाक्यावरून सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमाराला खासदार कपिल पाटील, आमदार विष्णू सवरा, कॉमेडी एक्स्प्रेस अरूण कदम, अभिजित चव्हाण, मृणाली ठाकूर यांनी झेंडा दाखवून गॅरेथॉनला सुरुवात झाली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या ज्ञानेश्वर मोरघा याची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याचे धावपटू स्नेहल रजपूत यांनी जाहीर केले. यावेळी ५५ वर्षीय रामजी गांगडा यांनीही खुला गट स्पर्धेत भाग घेऊन ११ किलो मीटर अंतर पार केले. त्यांनाही उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Rainy Marathon in the presence of artists in the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.