कृषी प्रदर्शनात रेनवॉटर हार्वेस्टिंग

By Admin | Updated: January 24, 2015 22:48 IST2015-01-24T22:48:22+5:302015-01-24T22:48:22+5:30

रायगड जिल्हा परिषद, कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने नावडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात विविध कृषीविषयक योजना, वस्तू अवजारे ठेवण्यात आली होती,

Rainwater Harvesting in Agriculture Exhibition | कृषी प्रदर्शनात रेनवॉटर हार्वेस्टिंग

कृषी प्रदर्शनात रेनवॉटर हार्वेस्टिंग

रविंद्र गायकवाड ल्ल कामोठे
रायगड जिल्हा परिषद, कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने नावडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात विविध कृषीविषयक योजना, वस्तू अवजारे ठेवण्यात आली होती, मात्र पनवेल तालुका पंचायत समितीने यानिमित्ताने रेन वॉटर हार्वेस्टिंगची माहिती देणारे मॉडेल प्रदर्शनात मांडून पाणी वाचविण्याबाबत अनोख्यारीतीने जनजागृती केली. त्याचबरोबर निर्मलग्राम स्वच्छता अभियानाचा प्रचार आणि प्रसार करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पाण्याच्या टंचाईवर मात करण्याकरिता शासनाकडून ग्रामीण भागात पाणी अडवा... पाणी जिरवा हे अभियान राबवले जाते. त्याचबरोबर बंधारे, नाल्यांची निर्मिती करून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न केला जातो. घरावर पडणारे पावसाचे पाणी साचून ठेवण्याकरीता पाऊस पाणी संकलन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना पुढे आली. विशेषत: शहरी भागात आणि त्यातल्या त्यात मुंबई, पुणे यासारख्या महानगरात ही सिस्टिम वापरण्यास सुरूवात झाली आहे. पनवेल तालुक्यात वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणे आगामी काळात तारेवरची कसरत होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात उन्हाळयात पाणी टंचाईची समस्या डोके वर काढत असल्याने आता या भागातही पाऊस पाणी संकलनाची गरज निर्माण झाली आहे.
पनवेल तालुका पंचायत समितीच्यावतीने ही प्रक्रिया जास्तीत जास्त इमारती, घरांवर लावण्याकरिता जनजागृती सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिल्या.

शौचालय बांधा : घरोघरी कमी खर्चाने शौचालय बांधा... आणि आरोग्यमय जीवनातून आर्थिक उन्नती साधा, असा संदेश देत शोषखड्ड्यांच्या शौचालयाची प्रतिकृती मांडण्यात आली. विटा, वाळू, सिंमेट, पी.व्ही.सी पाईप, मलपात्र, वॉटरसीट आदी वस्तूंच्या सहायाने अतिशय कमी खर्चात शौचालय कसे उभारते येऊ शकते याचे धडे प्रदर्शनात देण्यात आले. शौचालयापासून तयार होणारे खत शेतीकरिता किती उपयुक्त ठरते, त्याचबरोबर सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे गावाबाहेर शौचास जाण्याचा वेळ वाचतो आणि कुटुंबाची प्रतिष्ठा कशी उंचावती याचे संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात आले.

Web Title: Rainwater Harvesting in Agriculture Exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.