राज्यात पावसात जोर २३ सप्टेंबरपर्यंत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:21+5:302021-09-22T04:07:21+5:30
मुंबई : पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम- उत्तर/पश्चिम दिशेने ते उत्तर ...

राज्यात पावसात जोर २३ सप्टेंबरपर्यंत कायम
मुंबई : पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम- उत्तर/पश्चिम दिशेने ते उत्तर ओडिशा, उत्तर छत्तीसगड व उत्तर मध्य प्रदेशकडे पुढील तीन दिवसात सरकणार आहे. त्यामुळे राज्यात २३ सप्टेंबरपर्यंत पावसात जोर कायम राहणार आहे. २५ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाचा मारा पुन्हा कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कायम होता. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. लोकलही उशिराने धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय झाली.