Join us  

मुंबईत हाय टाईडचा इशारा, दुपारी 12 वाजता समुद्राला येणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:25 AM

मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आतापर्यंत मुंबई शहरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत मुंबई शहरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, उपनगरात 303 मिमी पाऊस झाला आहे.

मुंबई, दि. 20 - मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आतापर्यंत मुंबई शहरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, उपनगरात 303 मिमी पाऊस झाला आहे. डहाणूमध्ये 304 मिमी पाऊस कोसळला आहे. मुंबईतील 24 तासांतील पावसाच्या तुलनेत नवी मुंबईत 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 दरम्यान अधिक पाऊस झाला.  पहाटे 5.30 पर्यंत कुलाबा वेधशाळेत 191 मिमी, सांताक्रूझमध्ये 275 मिमी पावसाची नोंद झाली होती. 

बेलापूर 226.00 मिमी नेरुळ  206.30 मिमी वाशी 175.70 मिमी ऐरोली 178.40 मिमी वाशी 175.70 मिमी 

दुपारी 12 च्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्याचवेळी पावसाचा जोर वाढला तर, मुंबईत वेगवेगळया भागात पाणी साचू शकते. काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सकाळपर्यंत कायम होती. मुंबईतील वाहतूक व्यवस्था अद्यापपर्यंत तरी सुरळीत आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलसेवा काही मिनिट उशिराने सुरु आहे पण कुठेही ठप्प झालेली नाही. 

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकार