महाड तालुक्यात पावसाचा कहर

By Admin | Updated: June 25, 2015 00:34 IST2015-06-25T00:34:54+5:302015-06-25T00:34:54+5:30

तालुक्यातील नाते पुलावरून पुराच्या पाण्याबरोबर एक ५५ वर्षीय इसम वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली, तर पाऊस व वाऱ्यामुळे दहा घरांची पडझड झाली आहे.

Rainfall in Mahad taluka | महाड तालुक्यात पावसाचा कहर

महाड तालुक्यात पावसाचा कहर

महाड : तालुक्यातील नाते पुलावरून पुराच्या पाण्याबरोबर एक ५५ वर्षीय इसम वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली, तर पाऊस व वाऱ्यामुळे दहा घरांची पडझड झाली आहे.
दीपक महादेव रांजणकर (रा. नाते) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून सायंकाळपर्यंत त्याचा तपास लागला नसल्याचे नायब तहसीलदार महेंद्र बेलदार यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपापसून पडलेल्या मुसळधार पावसामुळे गांधारी नदीला पूर आलेला होता. नाते गावाला जोडणाऱ्या पुलावरदेखील दोन ते अडीच फूट पाणी असतानाही दीपक रांजणकर हे पुलावरून घराकडे जात असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. बुधवारी सकाळी तहसीलदार संदीप कदम व नायब तहसीलदार महेंद्र बेलदार यांनी घटनास्थळी जावून रांजणकर कुटुंबीयांची भेट घेतली.
मंगळवारच्या मुसळधार पावसात तालुक्यातील दहा घरांची पडझड झाली आहे. फौजी आंबवडे येथील अंगणवाडी इमारत, धामडोशी येथील सुरेश डवते, सांदोशी येथील सखाराम अवघडे, श्रीधर साळवे (कुंबळे), जैनबीबी देशमुख (अप्पर तुडील), सलाउद्दीन चाफेकर (साहिलनगर), सखाराम शिंदे (साकडी), पांडुरंग शिंदे (वणदेरी), कोथुर्डे सानारकोंड येथील हैबत पवार यांच्या घरांचे नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल यंत्रणेने तयार केले आहेत.
मंगळवारी रात्री शहरातील दस्तुरी मार्गावर पुराचे पाणी शिरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सकाळी पाऊस थांबल्यानंतर मात्र पुराचे पाणी ओसरल्याचे दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: Rainfall in Mahad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.