Join us

घरात शिरले पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 04:27 IST

शनिवारी दुपारपासून मुंबई उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे लोकांच्या घरातही पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले. मालाड पूर्वेकडील तानाजीनगर परिसरात सुहासिनी कदम राहतात.

मुंबई -  शनिवारी दुपारपासून मुंबई उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे लोकांच्या घरातही पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले. मालाड पूर्वेकडील तानाजीनगर परिसरात सुहासिनी कदम राहतात. त्यांच्या घराच्या मागेच मोठा नाला असल्याने दुपारी पावसात त्यांच्या घरात जवळपास एक फूट पाणी शिरले. अगदी थोड्या पावसातच हे पाणी आमच्या घरात शिरले. त्यामुळे घरातील साहित्य हलविण्यासाठीचा वेळही आम्हाला मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.तर सकाळी पावसामुळे एस. व्ही. रोड, लिंक रोड, आरे रोड, एम. जी. रोड या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. मी डॉक्टरकडे जाण्यासाठी १० वाजता मालाड लिंक रोडवरून रिक्षा घेतली. तेथे पोहोचण्यासाठी एक तास लागला. माझी अपॉइंटमेंटदेखील चुकली, असे एमबीएची विद्यार्थिनी अंकिता मयेकर हिने सांगितले.शॉर्टसर्किटमुळे महिलेचा मृत्यू, मुलगी जखमीमानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनीमधील मोहिते-पाटीलनगरमध्ये शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास कॉलनीत शॉर्टसर्किट होऊन, एका महिलेचा मृत्यू तर एक पाच वर्षांची मुलगी जखमी झाली. उषा सावंत (४०) असे मृत महिलेचे नाव आहे, तर समिधा सावंत असे जखमी मुलीचे नाव असून, तिची प्रकृती स्थिर आहे.दादरमध्ये जलवाहिनी फुटलीदादर पश्चिमेकडील सेना भवन रोडवर मेट्रोचे काम सुरू असतानाच, संध्याकाळी ५च्या सुमारास जलवाहिनी फुटली. तिच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, याचा फटका ना. म. जोशी मार्ग, भवानी शंकर रोड आणि एस. के. बोले रोडवरील रहिवाशांना बसला. तर दादर येथील गडकरी चौकातील अनुक्रमे १.४५ मीटर आणि ०.४५ मीटर व्यासाच्या दोन जलपुरवठा वाहिन्यांना जोडणाºया नलिकेचा सांधा त्याच्या दुरुस्ती प्रक्रियेच्या दरम्यान त्याच्यावर असणाºया काँक्रीटचे आवरण आणि त्याचा भार कमी झाल्यामुळे उघडला गेला. त्यामुळे त्यातून पाण्याचा उपसा सुरू झाला. दोन्ही बाजूंनी सदर व्हॉल्व तातडीने बंद करून परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.चेंबूरमध्ये बांधकामाचा भाग खचलाचेंबूरमधील चेंबूर वसंत पार्क येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बांधकामाचा भाग खचला. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी झालेली नाही. शिवाय येथील पायाभूत सेवा-सुविधांना दुर्घटनेची झळ बसलेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.दुपारी २ वाजेपर्यंतची पावसाची नोंदशहर १३.५९ मिमीपूर्व उपनगर ३७.५१ मिमीपश्चिम उपनगर २७.९७ मिमीमुलुंड ८०.८० मिमीजोगेश्वरी ६३.६० मिमीपवई ६५.८० मिमीघाटकोपर ६२.६० मिमीचेंबूर ६२.८० मिमीबोरीवली ६१.८० मिमीकांदिवली ५०.६० मिमीगोरेगाव ४९.६० मिमीअंधेरी ३१.४० मिमीबीकेसी ३३.६० मिमीदादर २४.00 मिमी

टॅग्स :पाऊसमुंबई