पावसाने मुंबईला झोडपले!
By Admin | Updated: July 10, 2014 02:50 IST2014-07-10T02:50:22+5:302014-07-10T02:50:22+5:30
मुंबईसह उपनगरांत सकाळपासून सायंकाळर्पयत कोसळलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईकरांची दाणादाण उडवून टाकली.

पावसाने मुंबईला झोडपले!
मुंबई : मुंबईसह उपनगरांत सकाळपासून सायंकाळर्पयत कोसळलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईकरांची दाणादाण उडवून टाकली. पावसाची रिपरिप दिवसभर कायम लागून राहिल्याने लोकलसह रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याने मुंबईतील व्यवहार काहीसे मंदावले होते. दरम्यान, 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सोमवारी बरसलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले होते. मंगळवारी मात्र तुरळक ठिकाणी बरसलेल्या पावसाने विश्रंती घेतली. बुधवारी पहाटेपासूनच पाऊस सक्रिय झाला आणि पूर्व-पश्चिम उपनगरांसह मुंबई शहरात सुरुवातीला रिमङिाम बरसलेल्या पावसाने दुपारी रुद्रावतार धारण करीत मुंबईकरांना धडकी भरली. पहाटे साडेपाचच्या सुमारास पूर्व उपनगरांत रिमङिाम बरसणा:या पावसाने सकाळी नऊ वाजता जोरदार वर्षावर सुरू केला.
शिवाय पश्चिम उपनगरांत सकाळी साडेनऊच्या सुमारास धुवाधार पावसाने सुरुवात केली. पूर्व उपनगरांत कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप-मुलुंड आणि पश्चिम उपनगरांत मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि वांद्रे येथील परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. तर मुंबई शहरात दादरपासून सीएसटी परिसर आणि चर्चगेटपासून अंधेरीर्पयतच्या पट्टय़ाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्यान, पूर्व उपनगरांत सकाळी साडेनऊ वाजता बरसलेल्या पावसामुळे सायन आणि ठाणो मार्गाला जोडणा:या लालबहादूर शास्त्री मार्गावरील जुना आग्रा रोड या बेस्ट बस स्थानकापासून घाटकोपर येथील राजावाडी बेस्ट बस स्थानकार्पयत वाहतूककोंडी झाली होती.
शिवाय कुर्ला पश्चिमेकडील कमानी जंक्शनपासून अंधेरी पूर्वेकडील साकीनाका जंक्शनर्पयतही वाहनचालकांना काही काळ वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला नाही; पण पावसाच्या संततधारेमुळे वाहनांना अडथळे येत होते. शिवाय वाहनांची गतीदेखील मंदावली होती.
तसेच कुर्ला रेल्वे स्थानकाचा पश्चिमेकडील परिसर, विद्याविहार रेल्वे स्थानकाचा पश्चिमेकडील परिसर, शीतल सिनेमागृह, दादर येथील हिंदमाता, बोरीवली सब वे आणि चिंचपोकळी येथील सरदार हॉटेल परिसर या सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला होता. (प्रतिनिधी)