पावसाने हुकलेली परीक्षा २३ जुलैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 06:04 IST2018-07-21T06:04:41+5:302018-07-21T06:04:50+5:30

मागच्या महिन्यात आणि जुलैमध्ये दोन ते तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आपल्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्यांची परीक्षा २३ जुलैला होईल.

The rain hit the examination on 23rd July | पावसाने हुकलेली परीक्षा २३ जुलैला

पावसाने हुकलेली परीक्षा २३ जुलैला

मुंबई : मागच्या महिन्यात आणि जुलैमध्ये दोन ते तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आपल्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्यांची परीक्षा २३ जुलैला होईल.
अतिवृष्टीमुळे परीक्षा केंद्रांवर काही विद्यार्थी वेळेत तर काही विद्यार्थी पोहोचूच शकले नव्हते. त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल, असे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्यानुसार, परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले असून, या परीक्षा २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. २५ जून, ३ जुलै आणि ९ जुलै रोजी परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे.
या परीक्षांमध्ये एमएससी, एमए, एमकॉम या अभ्यासक्रमाच्या विषयांसोबत एलएलबी सेमिस्टर एक आणि पाचच्या तीन विषयांचाही समावेश आहे.

Web Title: The rain hit the examination on 23rd July

टॅग्स :examपरीक्षा