जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस
By Admin | Updated: April 14, 2015 22:43 IST2015-04-14T22:43:30+5:302015-04-14T22:43:30+5:30
सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस
रसायनी : सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रसायनी परिसरात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यांना कच्च्या विटा झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. पावसामुळे संध्याकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या रोडावली. पनवेल परिसरात मुलांनी पावसात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मात्र अवकाळी पाऊस असाच सुरू राहिला, तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. (वार्ताहर)
कार्यक्रमावर पाणी
४नेरळ : कर्जत, माथेरान आणि नेरळ परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे ज्या वीटभट्ट्या पेटवल्या होती, त्या विझल्याने नुकसान झाले, तर आंबेडकर जयंती असल्याने कार्यक्र मात पावसाच्या हजेरीमुळे कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली.
बिरवाडी एमआयडीसीत विजेचा लपंडाव
४बिरवाडी : महाड एमआयडीसी व बिरवाडी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विजेचा लपंडाव सुरू झाला. आंबा पिकासह भुईमुगाचे नुकसान झाले आहे. महावितरणकडून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. दिवसातून किमान ८ ते १० वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.