Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाची हानी करणाऱ्यांकडून एका वर्षात रेल्वेने केली ५८ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:46 IST

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने पर्यावरण दिन साजरा केला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी वृक्षारोपण केले. मध्य रेल्वेने २०१८-१९ या वर्षात ५ लाख ८ हजारांपेक्षा अधिक झाडे लावली. 

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरात कचरा आणि पर्यावरणाची हानी करणाºया प्रवाशांना दंड ठोठावला आहे. २०१८-१९ या वर्षात ३१ हजार ९३९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातून ५८ लाख १७ हजार ७३२ रुपयांचा दंड वसूल झाला आहे. एप्रिल २०१९ मध्ये एकूण २ हजार ४८० तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातून पर्यावरणाची हानी आणि कचरा करणाऱ्यांकडून ४ लाख ३२ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी प्रवाशांनामध्ये जनजागृतीचे काम केले जात आहे. वादविवाद, फ्लॅश मॉब, नाटक यांचे अभियान चालविण्यात येत आहे. ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ याला वाढविण्यासाठी स्वच्छता अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने पर्यावरण दिन साजरा केला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी वृक्षारोपण केले. मध्य रेल्वेने २०१८-१९ या वर्षात ५ लाख ८ हजारांपेक्षा अधिक झाडे लावली. प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर कमी होण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर २०० वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. प्लॅस्टिक वॉटल क्रॅश करणाºया १३ मशीन गर्दीच्या स्थानकांवर बसविण्यात आल्या आहेत.

माटुंगा आणि परळ वर्कशॉपमध्ये झाडांचे प्रमाण वाढविले आहे. प्रवाशांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी पोस्टर, घोषवाक्य यांच्या स्पर्धा घेतल्या. मध्य रेल्वेद्वारे पर्यावरण दिनी विशेष पुस्तक प्रकाशित केले.

 

टॅग्स :रेल्वे