Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तासाभरापासून ठप्प, कल्याणपुढील सर्व स्टेशन अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 23:54 IST

शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान वीज पूरवठ्यात बिघाड झाला. सुमारे अर्ध्या तासापासून कल्याण व पुढील सर्व स्टेशन आंधारात आहे. प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला आहे.

कल्याण - शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी रखड्डपट्टी झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक एक्सप्रेस गाड्याही तासाभरापासून खोळबंल्या आहेत. 

शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान वीज पूरवठ्यात बिघाड झाला. सुमारे अर्ध्या तासापासून कल्याण व पुढील सर्व स्टेशन आंधारात आहे. प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला आहे.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वे