रेल्वे कर्मचा:यांचीच ‘मोफतगिरी’

By Admin | Updated: August 5, 2014 00:48 IST2014-08-05T00:48:59+5:302014-08-05T00:48:59+5:30

रेल्वे पोलिसांकडून फुकट प्रवास रेल्वेतून केला जात असतानाच आता रेल्वेचे कर्मचारीही यात मागे नसल्याचे समोर आले आहे.

Railway staff: they are 'free' | रेल्वे कर्मचा:यांचीच ‘मोफतगिरी’

रेल्वे कर्मचा:यांचीच ‘मोफतगिरी’

मुंबई :  रेल्वे पोलिसांकडून फुकट प्रवास रेल्वेतून केला जात असतानाच आता रेल्वेचे कर्मचारीही यात मागे नसल्याचे समोर आले आहे. मेल-एक्सप्रेस गाडय़ांमधून ‘मोफत’ प्रवास करत अनेक प्रवाशांच्या सीट बळजबरीने बळकावण्याचे प्रकार पश्चिम रेल्वे कर्मचा:यांकडून घडत असून याबाबतच्या अनेक तक्रारी रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकाकडे  आल्या आहेत. अखेर याचे गंभीर स्वरुप पाहता विभागीय नियंत्रक व्यवस्थापकांनी हे प्रकरण पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे पाठवले आहे. 
उपनगरीय लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाडय़ांमधून रेल्वे पोलिस मोफत प्रवास करतानाचे आढळतात. उपनगरीय लोकलमधून विनातिकिट रेल्वे पोलिसांवर टीसी आणि रेल्वे पोलिसांच्याच मदतीने कारवाईदेखिल करण्यात आली. तरीही पुन्हा जैसे थेच परिस्थीती झाली. असे असतानाच पश्चिम रेल्वे कर्मचा:यांचा लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून विनातिकिट मोफत प्रवास बिनदिक्कतपणो सुरु आहे. 
हा प्रवास करताना तर एसी असो वा नॉन एसी डबा, रेल्वेचे अनेक कर्मचारी आरक्षित डब्यातून घुसून अन्य प्रवाशांची जागा बळकावतात आणि दादागिरी करत प्रवाशांना हुसकावून लावत असल्याचे रेल्वेतील एका अधिका:याने सांगितले. 
याबाबतच्या अनेक तक्रारी प्रवासी संघटना आणि अन्य प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या. त्यानंतर 23 जुलै रोजी असा मोफत प्रवास करणा:या रेल्वे कर्मचा:यांविरोधात मोहीम उघडण्यात आली. यात मोठय़ा संख्येने रेल्वेचे कर्मचारी मोफत प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. 
अखेर याबाबतची तक्रार पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकाकडे करण्यात आली आणि त्यांनी  एक पत्रच रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे पाठवून त्यावर कारवाई करण्याची मागणीच केली आहे. (प्रतिनिधी)
 
59023/59024 वलसाड फास्ट पॅसेंजर, 12921/12922 फ्लाईंग राणी एक्सप्रेस, 12953/12954 ऑॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, 12955 जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि 12961 अवंतिका एक्सप्रेसमधून पश्चिम रेल्वे कर्मचारी मोफत प्रवास करतात. 

 

Web Title: Railway staff: they are 'free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.