मुंबई विद्यापीठात रेल्वे संशोधन केंद्र
By Admin | Updated: April 19, 2015 00:31 IST2015-04-19T00:31:35+5:302015-04-19T00:31:35+5:30
विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये हे केंद्र उभारले जाणार असून विद्यार्थ्यांना येथे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येईल.

मुंबई विद्यापीठात रेल्वे संशोधन केंद्र
मुंबई : मुंबई विद्यापीठात लवकरच देशातील पहिले रेल्वे संशोधन केंद्र स्थापन केले जाणार आहे. विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये हे केंद्र उभारले जाणार असून विद्यार्थ्यांना येथे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येईल. शनिवारी मुंबई विद्यापीठ आणि भारतीय रेल्वे यांच्यामध्ये राजभवन येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथील दरबार हॉल येथे हा सामंजस्य करार झाला. यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
भारतीय रेल्वेच्या व्हिजन - २०२० उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेने उच्च शिक्षणात रेल्वेशी निगडीत तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाशी शैक्षणिक सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या करान्वये मुंबई विद्यापीठात स्थापन होणाऱ्या रेल्वे संशोधन केंद्रामध्ये भारतीय
रेल्वेसाठी लागणारे प्रगत आणि विकसित तंत्रज्ञान पुरविले जाणार आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये स्थापन होणाऱ्या या केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही हे केंद्र उभारावे असे आवाहन राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी या वेळी केले. तसेच राज्यातील विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी आपल्या नजीकचे एक तरी रेल्वे स्थानक दत्तक घेऊन महिन्यातील किमान एक दिवस तेथे स्वच्छता मोहीम राबवावी,
अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली.
भारतीय रेल्वेचा जागतिक दर्जा टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. तसेच मुंबई विद्यापीठात सुरू होत असलेल्या नव्या रेल्वे संशोधन केंद्रामुळे रेल्वेसेवा व प्रशासनामध्ये गतिमानता येऊन गुणात्मक सुधार आणण्यास मदत होईल, असा विश्वासही प्रभू यांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
च्हेवी हॉल टेक्नॉलॉजी
च्व्हेईकल डायनामिक्स
च्हाय स्पीड टेक्नॉलॉजी
च्एनर्जी एफिशिएंट ट्रॅक्शन पॉवर सप्लाय सिस्टम
च्ट्रॅक रिसर्स
च्युज आॅफ आर्टिफिशिअल इंटेलिजेंस फॉर प्रीडेक्टीव्ह मेंटेनंस अँड मॅनेजमेंट
च्मटेरिअल सायन्सेस फॉर रेल्वे रिलेटेड कम्पोझिट्स इन्क्लुडिंग रबर्स,पॉलिमर्स अँड इन्सुलेशन मटेरिअल्स
च्डेव्हलपमेंट आॅफ इंटिग्रेटेड/ एम्बेडेड प्रोसेसर फॉर रेल्वे एप्लीकेशन्स
च्एप्लीकेशन्स फॉर एक्सेस कंट्रोल,सिक्युरिटी अँड सेफ्टी इन्क्लुडिंग बायोमेट्रीक्स
च्ओपन प्लॅटफॉर्म प्रपोल्शन कंट्रोल सिस्टम फॉर रेल व्हेईकल
च्नॉन कन्व्हेंशनल ड्राईव्हस अँड टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग मॅग्लेव,एलआयम
च्रिमोट सेंसिंग अँड मेजरमेंट आॅफ ओएचई, ट्रॅक अँड सिग्नल्स