लोहमार्ग पोलिसांना दोन हजार होमगार्डची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:07 IST2021-09-27T04:07:52+5:302021-09-27T04:07:52+5:30
मुंबई : लोहमार्ग रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यांना सध्या कमी मनुष्यबळात काम करावे लागत असून लोहमार्ग ...

लोहमार्ग पोलिसांना दोन हजार होमगार्डची गरज
मुंबई : लोहमार्ग रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यांना सध्या कमी मनुष्यबळात काम करावे लागत असून लोहमार्ग पोलिसांना मदतीसाठी दोन हजार होमगार्डची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. होमगार्डच्या मानधनाचा तिढा सुटला नाही. तीन महिने उलटले तरी लोहमार्ग पोलिसांच्या सेवेसाठी होमगार्ड तैनात आलेले नाहीत.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची सुरक्षा तसेच स्थानकातील सुरक्षेबरोबरच गरज असेल तेव्हा प्रवाशांना मदत करणे अशा जबाबदाऱ्या होमगार्डकडे देण्यात येतात. होमगार्डमुळे लोहमार्ग पोलिसांचा ताण कमी होतो. परंतु एप्रिल २०२१पासून राज्यात विविध भागात तैनात होमगार्डला मानधनच मिळत नसल्याने १ जुलैपासून त्यांचे काम थांबले. होमगार्डला प्रतिदिन ६७० रुपये मिळतात. राज्यातील होमगार्डची मानधनाची रक्कम थकीत होती. शासनाने ३६० कोटी रक्कम मंजूर केली. पण केवळ १८० कोटी देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम न मिळाल्याने होमगार्ड सेवेत येऊ शकले नाहीत. त्याचा फटका लोहमार्ग पोलिसांनाही आहे.