Join us
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी तीनही मार्गांवर होणार रेल्वे प्रवाशांची गैरसोय; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 05:44 IST

मध्य, पश्चिम आणि हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई -  विविध कामे करण्यासाठी रविवार, ११ डिसेंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप- डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे कुठे : बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंतपरिणाम : या ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेचा काही उपनगरीय लोकल सेवा रद्द असणार आहे.  

मध्य रेल्वे कुठे : ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन पाचवी - सहावी मार्गिकेवरकधी : सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत परिणाम : या ब्लॉकदरम्यान पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पाटणा-एलटीटी एक्स्प्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस आणि कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आणि वेळेनुसार १०-१५ मिनिटे उशिरा पोहोचेल. तर काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांना दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहेत.  

हार्बर रेल्वेकुठे : चुनाभट्टी ते वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता आणि सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएमएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.  

टॅग्स :मुंबई लोकल