रेल्वेची आॅनलाइन आरक्षण सेवा ठप्प

By Admin | Updated: March 7, 2015 01:42 IST2015-03-07T01:42:47+5:302015-03-07T01:42:47+5:30

भारतीय रेल्वेची प्रवासी आॅनलाइन आरक्षण सेवा (६६६.्रल्ल्िरंल्ल१ं्र’.ॅङ्म५.्रल्ल) ठप्प झाले होते. रेल्वेकडून या वेबसाइटचे सकाळपासून देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

Railway online reservation service jam | रेल्वेची आॅनलाइन आरक्षण सेवा ठप्प

रेल्वेची आॅनलाइन आरक्षण सेवा ठप्प

मुंबई : भारतीय रेल्वेची प्रवासी आॅनलाइन आरक्षण सेवा (६६६.्रल्ल्िरंल्ल१ं्र’.ॅङ्म५.्रल्ल) ठप्प झाले होते. रेल्वेकडून या वेबसाइटचे सकाळपासून देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या संदर्भात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिलेली नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
ही भारतीय रेल्वेची स्वत:ची प्रवासी आॅनलाइन आरक्षण वेबसाइट असून, या वेबसाइटच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम रेल्वेच्याच क्रिसकडे (सेंटर फॉर इन्फॉर्मेशन सिस्टीम)आहे. या वेबसाइटवर रेल्वेची आणि अन्य सेवांच्या माहितीबरोबरच प्रवासी आरक्षण सुविधाही आहे. ही आॅनलाइन आरक्षण सुविधा फक्त मध्यरात्री एक तास बंद ठेवण्यात येते. होळीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत ही सेवा बंद असल्याचे प्रवाशांना जाणवले.
होळीच्या दिवशी घरबसल्या अनेक जण रेल्वेच्या वेबसाइटवर जाऊन आॅनलाइन आरक्षणाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र देखभाल आणि दुरुस्तीमुळे पीएनआर तसेच ट्रेनची सद्य:स्थिती मिळू शकत नसल्याचा संदेश वेबसाइवर सातत्याने येत होता. त्यामुळे अनेकांची गैरसोय होऊ लागली. वेबसाइटचे अचानक काम हाती घेण्यात आले की अन्य समस्या उद्भवली, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होऊ लागला. यानिमित्ताने पुन्हा एकदा रेल्वेच्या अनागोंदी कारभाराचे उदाहरण समोर आले.
या वेबसाइटवर समस्या येत असल्याने अखेर आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन वेबसाइट) वेबसाइटवर जाऊन तिकीट आरक्षण सेवेचा लाभ प्रवासी घेत होते. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांना विचारले असता, काही कामानिमित्त ही वेबसाइट बंद ठेवण्यात आली असेल. परंतु याची माहिती नाही, असे सांगितले.

Web Title: Railway online reservation service jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.