रेल्वे अधिकाऱ्याने कार्यालयात घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:17 IST2021-01-08T04:17:03+5:302021-01-08T04:17:03+5:30
विद्याविहार रेल्वे स्थानकातील घटना, घाटकोपर पोलिसांकडून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विद्याविहार रेल्वे स्थानकातील कार्यालयातच चीफ ...

रेल्वे अधिकाऱ्याने कार्यालयात घेतला गळफास
विद्याविहार रेल्वे स्थानकातील घटना, घाटकोपर पोलिसांकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्याविहार रेल्वे स्थानकातील कार्यालयातच चीफ बुकिंग सुपरवायझर कैलास कदम (वय ५५) यांनी बुधवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहे.
घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठविला असून, अधिक चौकशी सुरू आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांचे सहकारी, नातेवाईक यांच्याकडे पोलीस चौकशी करत आहे. त्यांनी कुठल्या तणावातून टोकाचे पाऊल उचलले याबाबत तपास सुरू आहे. तसेच स्थानकातील सीसीटीव्हीही तपासण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांचा कुणाशी अखेरचा संवाद झाला? आदीबाबत पोलीस तपास करत आहेत.