रविवारी रेल्वेचे मेगाब्लॉक
By Admin | Updated: October 17, 2014 22:54 IST2014-10-17T22:54:35+5:302014-10-17T22:54:35+5:30
दिवाळीच्या आधीचा शेवटचा रविवार असल्याने गाडय़ांना गर्दी होऊ शकते. मात्र, तरीही रेल्वेने प्रवाशांचा विचार न करता येत्या रविवारीदेखील (19 ऑक्टोबर) मेगाब्लॉक आहे.

रविवारी रेल्वेचे मेगाब्लॉक
दिवाळीपूर्वीचा अखेरचा रविवार बोंबला : तीन ठिकाणी होणार
डोंबिवली : दिवाळीच्या आधीचा शेवटचा रविवार असल्याने गाडय़ांना गर्दी होऊ शकते. मात्र, तरीही रेल्वेने प्रवाशांचा विचार न करता येत्या रविवारीदेखील (19 ऑक्टोबर) मेगाब्लॉक आहे.
कल्याण-ठाणो अप धीम्या मार्गासह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक स. 11.3क् ते संध्याकाळी 4 आणि हार्बरवर स. 11 ते दु. 3 या वेळेत घेण्यात येईल. मुख्य मार्गावरील लोकल ब्लॉकच्या कालावधीत अप जलद मार्गावर वळविणार असल्याने ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकांमध्ये लोकल धावणार नाहीत. त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांना डाऊनच्या ठाणो व डोंबिवली स्थानकांतून आहे त्याच तिकीट-पासावर प्रवासाची मुभा रेल्वेने दिली आहे.
हार्बर मार्गावरील नेरूळ-मानखुर्द मार्गावर अप/डाऊन दिशांवर ब्लॉक आहे. 11 ते दु. 3 या कालावधीत सीएसटी ते बेलापूर/वाशी/पनवेल या ठिकाणी अप/डाऊन दोन्ही दिशांवरील गाडय़ा रद्द असतील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी-मानखुर्द तसेच ट्रान्स-हार्बरच्या ठाणो-पनवेल या दोन्ही मार्गावर अप/डाऊन दिशांवर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत आहे त्याच तिकीट/पासावर ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवासाची मुभा असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
प. रे.चा जम्बोब्लॉक
सिगAल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळांचे काम आदींच्या देखभालीसाठी चर्चगेट-मुंबई सेंट्रल मार्गावरील धीम्या डाऊन दिशेवर पश्चिम रेल्वेने रविवारी जम्बोब्लॉक घेण्याचे ठरवले आहे. हा ब्लॉक स. 1क्.35 ते दु. 3.35 या कालावधीत असेल. ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरील गाडय़ा डाऊन जलदवर वळविण्यात येणार आहेत.