रुळाला तडे गेल्याने रेल्वे विस्कळीत
By Admin | Updated: October 8, 2015 02:58 IST2015-10-08T02:58:37+5:302015-10-08T02:58:37+5:30
गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर रुळाला तडे जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. बुधवारी सकाळीही टिटवाळा-आंबिवलीदरम्यान

रुळाला तडे गेल्याने रेल्वे विस्कळीत
टिटवाळा : गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर रुळाला तडे जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. बुधवारी सकाळीही टिटवाळा-आंबिवलीदरम्यान याचीच पुनरावृत्ती झाली. सकाळी ७ च्या सुमारास रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नोकरदारांचे हाल झाले.
दोन महिन्यांतील ही तिसरी घटना असल्याने प्रवासीवर्गातून रेल्वे प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. यामुळे मुंबई व कसारादरम्यानची वाहतूक दोन तास ठप्प होऊन नंतर धीम्या गतीने सुरू झाली, तसेच तपोवन एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेसही खोळंबली होती. टिटवाळा येथील रेल्वे फाटकावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.