रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: March 25, 2015 02:32 IST2015-03-25T02:32:57+5:302015-03-25T02:32:57+5:30

अपघात भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षाही धोकादायक असल्याची गंभीर बाब आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या एका संशोधन अहवालातून समोर आली आहे.

Railway accident question serious | रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर

रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर

मुंबई : मुंबईत रेल्वे अपघातात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, हे अपघात भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षाही धोकादायक असल्याची गंभीर बाब आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या एका संशोधन अहवालातून समोर आली आहे. मुंबईतील विविध रेल्वे अपघातांत २0१३ मध्ये ३ हजार ५0६ जणांचे मृत्यू झाले असून, भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत २0१३ मध्ये ४0५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे. मुंबई ही जीवनवाहिनी आहे की मृत्युवाहिनी? असे सांगत रेल्वेमंत्री यावर बोलणार कधी, असा सवाल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीन्द्र कुलकर्णी यांनी उपस्थित केला. दिल्लीकरांनी याचे गांभीर्य ओळखले पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुंबईतील रेल्वे अपघातांवर प्रकाश टाकणारा फाउंडेशनकडून ‘किलर ट्रॅक’ या नावाने एक संशोधन अहवाल तयार करण्यात आला. यामध्ये २00२ पासून होणारे विविध अपघात, रेल्वे अपघात रोखण्यासाठी होणारे प्रयत्न, रेल्वेचा कायदा आणि अन्य माहिती समोर आाणण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे अपघातांत होणारे मृत्यू आणि भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांतील मृत्यूंची तुलना करण्यात आली आहे. २00२ साली मुंबईतील रेल्वे अपघातांत एकूण २ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला होता. तर दशहतवादी हल्ल्यांत १ हजार १७४ जण ठार झाले होते. त्यानंतर २0१३ पर्यंत रेल्वे अपघातांतील मृत्यूचे प्रमाण वाढतच गेले. २0१३ मध्ये ३ हजार ५0६ जणांचा मृत्यू झाला असून, याच वर्षात ४0५ जण ठार झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यांत २00२ पासून ते २0१२ पर्यंत ठार झालेल्यांचे प्रमाण ४00 ते १,२00 एवढे राहिले असल्याचे सांगण्यात आले.
मात्र हे प्रमाण बघता दहशतवादापेक्षा रेल्वे अपघात खूपच धोकादायक असल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात होत असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

२00२ साली मुंबईतील रेल्वे अपघातांत एकूण २ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला होता; तर दशहतवादी हल्ल्यांत १ हजार १७४ जण ठार झाले होते. २0१३ मध्ये ३ हजार ५0६ जणांचा मृत्यू झाला असून, याच वर्षात ४0५ जण ठार झाले आहेत.

Web Title: Railway accident question serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.