Join us  

अंधेरी, बोरिवलीमधील रेल कोच रेस्टॉरंट ठरणार आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:26 AM

दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन : नवी मुंबईत उभारणार एकता मॉल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशभरातील ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या सहा हजार रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतानाच देशभरातील १० वंदे भारत ट्रेन आणि इतर रेल्वे सेवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ५०६ प्रकल्पांचा समावेश असून, नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे ४ रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले, तर नवी मुंबईत एकता मॉल उभारले जाणार आहे. 

या प्रकल्पांत १५० वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, १३० सोलर पॅनेल, १८ नवीन लाईन्स, लाइन्सचे दुहेरीकरण, गेज कन्व्हर्जन, १२ गुड्स शेड, ७ ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम, ४ गती शक्ती टर्मिनल आणि ३ विद्युतीकरण प्रकल्प, फलटण - बारामती नवीन रेल्वेलाईन यांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी खा. पूनम महाजन आणि मनोज कोटक यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी लोणावळा येथे या कार्यक्रमास उपस्थिती लावली. 

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल हे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर उपस्थिती दर्शविली.

‘राज्याच्या विकासात केंद्राचे साहाय्य’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, लातूर येथील कारखान्यात तयार होत असलेल्या वंदे भारत ट्रेनची राज्यातील संख्या सातवर पोहोचली असून, राज्याच्या विकासात केंद्र सरकारचे मोठे साहाय्य मिळत आहे.

५२०० चौरस मीटरवर मॉलचे बांधकाम 

केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात एकता मॉल स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्यात येणार आहे. ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यास मदत करण्यासाठी हा मॉल उपयुक्त ठरणार आहे. सिडकोला यासाठी अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमले. नियोजन विभागाने उलवेमध्ये एकता मॉलसाठी भूखंड निश्चित केला आहे. हा भूखंड ५२०० चौरस मीटर एवढा आहे. अठरा महिन्यांत या मॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे प्रकल्प

- लातूर येथे कोच कारखाना- बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा- पुणे येथील वंदे भारत मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो- लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथे ५ जन औषधी केंद्र- नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे ४ रेल कोच रेस्टॉरंट वंदे भारत ट्रेन

म्हैसूर - चेन्नईलखनौ - देहराडूनकलबुर्गी - बंगळुरूरांची - वाराणसीहजरत निजामुद्दीन - खजुराहो सिकंदराबाद - विशाखापट्टणमन्यू जलपाईगुडी - पाटणापाटणा - लखनऊअहमदाबाद - मुंबई सेंट्रलभुवनेश्वर - विशाखापट्टणम.

 

टॅग्स :रेल्वे