रायगड पोलीस सज्ज

By Admin | Updated: August 26, 2014 23:44 IST2014-08-26T23:44:02+5:302014-08-26T23:44:02+5:30

रायगड पोलीस कार्यक्षेत्रांतील गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी (पोलादपूर) या महामार्ग टप्प्यात रायगड पोलिसांची विशेष वाहतूक नियंत्रण योजना अमलात आणली

Raigad Police Ready | रायगड पोलीस सज्ज

रायगड पोलीस सज्ज

जयंत धुळप, अलिबाग
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणा-या गणेशभक्तांना वाहतुकीच्या निमित्ताने कोणतीही समस्या येवू नये याकरिता रायगड पोलीस कार्यक्षेत्रांतील गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी (पोलादपूर) या महामार्ग टप्प्यात रायगड पोलिसांची विशेष वाहतूक नियंत्रण योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या चोख अंमलबजावणीमुळे गेल्या दोन दिवसांत गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोठेही वाहतूक कोंडी होवून गणेशभक्तांना अडकावे लागले नसल्याची माहिती या विशेष वाहतूक नियंत्रण योजनेची प्रत्यक्ष महामार्गावर विविध ठिकाणी जातीने हजर राहून अंमलबजावणी करीत असलेले रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांत एकाही ठिकाणी वाहतूक कोंडी न होता सुमारे ६० हजार वाहने कोकणात रवाना झाली आहेत.
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या विशेष वाहतूक नियंत्रण योजनेच्या अंमलबजावणीकरिता एकूण ५२ केंद्रे निश्चित करण्यात आली असून, ६६ पोलीस अधिकारी व ४४७ पोलीस जवान २४ तास या केंद्रांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणाचे काम प्रत्यक्ष महामार्गावर करीत आहेत. या पोलीस बळात रायगड पोलीस दलाचे पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, २७ पोलीस उप निरीक्षक आणि २४२ पोलीस जवान तर राज्य महामार्ग वाहतूक पोलीस दलाचे ३ पोलीस निरीक्षक, २१ पोलीस उपनिरीक्षक आणि २०५ वाहतूक पोलीस यांचा समावेश आहे.
आजकाल सर्वसाधारणपणे खाजगी वाहनांमध्ये एफएम रेडिओ वाहिनी ऐकली जाते, हे विचारात घेवून रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या सहकार्याने गोवा महामार्गावरील वाहतुकीचे ‘अपडेड्स’ व सूचना प्रसारित करण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त खारपाडा टोलनाका येथे ध्वनीक्षपक यंत्रणेच्या माध्यमातून वाहन चालकांकरिता विशेष सूचना केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Web Title: Raigad Police Ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.