पर्यटनासाठी रायगडला पसंती

By Admin | Updated: October 28, 2014 22:50 IST2014-10-28T22:50:07+5:302014-10-28T22:50:07+5:30

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त महाड तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे.

Raigad likes to travel | पर्यटनासाठी रायगडला पसंती

पर्यटनासाठी रायगडला पसंती

संदीप जाधव - महाड
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त महाड तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. यापैकी सर्वाधिक पसंती रायगड किल्ल्याला असल्याचे गेल्या चार पाच दिवसांच्या गर्दीवरून दिसून येत आहे. रायगड किल्ला पाहण्यासाठी सध्या दररोज सुमारे पाच हजारांहून अधिक पर्यटक हजेरी लावत असून गडावरील गैरसोईमुळे या पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या महाड तालुक्यात छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यासह पाचाड येथील जिजामाता समाधीस्थळ, महाडमध्ये ऐतिहासिक चवदार तळे, दासबोध ग्रंथाचे जन्मस्थान शिवथरघळ, पांडव लेणी, सर्व येथील गरम पाण्याचे झरे, विरेश्वर मंदिर आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत. सध्या दिवाळी सुट्टीनिमित्त येणा:या पर्यटकांची संख्या वाढतच असून स्थानिक पर्यटन व्यवसायाला यामुळे चालना मिळत आहे. शासकीय विo्रामगृहासह परिसरातील सर्व लॉजिंग बोर्डिग हाऊसफुल्ल असून हॉटेल व्यवसायदेखील तेजीत असल्याचे दिसून येत आहे.
रायगड किल्ल्याच्या पर्यटनासाठी येणा:या पर्यटकांची रोप वेने जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असून पहाटेपासून सुरू असलेला हा रोप वे रात्री उशिरार्पयत सुरू ठेवणो भाग पडत आहे. रोप वेने गडावर जाण्यासाठी पाच पाच तास पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असून रोप वे गर्दी पाहून अनेक पर्यटक पायी चढून गडावरील शिवसमाधीला नतमस्तक होत आहेत. 
रायगडावर मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होत असून गडाच्या देखभालीकडे होणा:या दुर्लक्षामुळे पाय:यांचे मार्ग कोसळले असून अनेक ठिकाणी कठडेदेखील भगAावस्थेत झाले आहेत. कोसळलेल्या पाय:यामुळे व मोडकळीस आलेल्या कठडय़ांमुळे दररोज अपघात होत आहेत. गडाच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाकडून होणा:या दुर्लक्षामुळे पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून पर्यटकांना राहण्याची सुविधा नसल्यामुळे या पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 
 
अतिउत्साही पर्यटकांचा अतिरेक 
रायगडावरील टकमकटोक, हिरकणी बुरुज, नगारखाना, मनोरे यासारख्या उंच व धोकादायक ठिकाणी स्टाईलमध्ये कॅमे:यात छबी टिपण्यासाठी अतिउत्साही पर्यटकांचा अतिरेक अपघातास कारणीभूत ठरत आहे. अशाच प्रकारच्या अतिरेकी खेळात यापूर्वी चार ते पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र या अतिउत्साही पर्यटकांना आवर घालणो मुश्कील होत आहे. मात्र किल्ल्याची दुरवस्था तसेच या ठिकाणी गैरसोई पाहून पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असतो. 
 
रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य 
गडावर दरवर्षी शिवपुण्यतिथी, शिवराज्याभिषेक दिन आदी सोहळे हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरे केले जातात. दिवाळीपासून असंख्य पर्यटक ांसह शैक्षणिक सहलीदेखील गडदर्शनासाठी येत असतात. मात्र या गडाच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच देखभालीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महाडपासून पाचाडर्पयत रायगडकडे जाणा:या रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डय़ांचे साम्राज्य आहे. यामुळे महामार्ग ते पाचाड हे अंतर जाण्यासाठी पर्यटक हैराण होत आहेत.
 
शासन उदासीन
रायगडचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक येतात. मात्र येथील गैरसोईमुळे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. पर्यटन महामंडळाच्या गडावरील खोल्या अत्यंत महागडय़ा दरात असल्याने सामान्य पर्यटकांना या ठिकाणी राहणो परवडत नाही. यामुळे या पर्यटकांची गैरसोय होत असते. गडाच्या पायथ्याशी पर्यटकांच्या निवासाची सोय शासनाने करावी, अशी अपेक्षा गेल्या 55 वर्षापेक्षाही अधिक काळ शिवभक्तांची सेवा करणारे हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Raigad likes to travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.