ओशिवऱ्यात हुक्का पार्लरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:07 IST2020-12-29T04:07:29+5:302020-12-29T04:07:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओशिवऱ्यात रविवारी सरकारने दिलेल्या वेळेच्या परवानगीचे उल्लंघन करत, रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आलेल्या ...

ओशिवऱ्यात हुक्का पार्लरवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओशिवऱ्यात रविवारी सरकारने दिलेल्या वेळेच्या परवानगीचे उल्लंघन करत, रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आलेल्या ‘हबीबी कॅफे अँड लॉज’वर पोलिसांनी धाड टाकली. त्यात जवळपास ३३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, २२ ग्राहकांचा यात समावेश आहे.
संबंधित लॉजने प्रवेशद्वाराची लाइट बंद करून मुख्य शटरही बंद केले होते. मात्र, आतमध्ये लॉज सुरू ठेवण्यात आला होता. याबाबत ओशिवरा पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक गिरीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धाड टाकण्यात आली. तेव्हा त्या ठिकाणी २२ जण हुक्का पित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, ज्यात ४ महिलांचाही सहभाग होता. त्यानुसार, जवळपास २९ जणांना ताब्यात घेत, चार महिलांना दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देण्यात आली.