राहुलची रुग्णवाहिकेतून पोलिसांसमोर हजेरी

By Admin | Updated: April 14, 2016 01:33 IST2016-04-14T01:33:25+5:302016-04-14T01:33:25+5:30

प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या राहुल राज सिंग याने बुधवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. तब्बल दोन तासाच्या चौकशीत पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना

Rahul's ambulance to police before attendance | राहुलची रुग्णवाहिकेतून पोलिसांसमोर हजेरी

राहुलची रुग्णवाहिकेतून पोलिसांसमोर हजेरी

मुंबई : प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या राहुल राज सिंग याने बुधवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. तब्बल दोन तासाच्या चौकशीत पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुलने नकारार्थी उत्तर दिले.
राहुलविरोधात गुन्हा दाखल केल्यापासून तो कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान त्याने दिडोंशी सत्रन्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अठरा एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे अंतरिम आदेश मंगळवारी दिले. मात्र पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश त्याला देण्यात आले. त्यानुसार बुधवारी दुपारी तो त्याच्या डॉक्टरांसोबत रुग्णवाहिकेतून पोलीस ठाण्यात आला.
बांगुरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत पोलिसांनी प्रत्युषासोबत वेळोवेळी झालेल्या भांडणाबाबत, मारहाणीबाबत त्याला प्रश्न विचारले. मात्र राहुलने आपले प्रत्युषावर प्रेम होते, तिला कधीही मारहाण अथवा शिवीगाळ केली नाही, जिवे मारण्याची धमकी दिली नाही, असा दावा केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चौकशीनंतर त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Rahul's ambulance to police before attendance