राहुल प्रत्युषाला देहविक्रीयासाठी भाग पाडत होता ?

By Admin | Updated: November 4, 2016 16:31 IST2016-11-04T15:36:06+5:302016-11-04T16:31:47+5:30

प्रत्युषा बॅनर्जी हिला बॉयफ्रेंड राहुल राज याने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Rahul was pushing for a reaction against sex? | राहुल प्रत्युषाला देहविक्रीयासाठी भाग पाडत होता ?

राहुल प्रत्युषाला देहविक्रीयासाठी भाग पाडत होता ?

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 - बालिका वधुफेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिला बॉयफ्रेंड राहुल राज याने देहविक्रय करण्यास भाग पाडले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्युषा आणि राहुल यांच्यात फोनवर झालेल्या शेवटच्या संभाषणातून  समोर आले आहे. त्यामुळे  प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 
बालिका वधू या कार्यंक्रमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रत्युषा बॅनर्जी हिने काही महिन्यांपूर्वी गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्या करताना तिने सुसाइड नोट न ठेवल्याने तिच्या आत्महत्येबाबत गुढ वाढले होते. मात्र प्रत्युषा आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल राज यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती सुरुवातीलाच समोर आली होती. साहजिकच संशयाची सुई राहुल राजकडे वळली होती. दरम्यान, दोघांमध्ये फोनवर झालेले शेवटचे संभाषण समोर आले आहे. प्रत्युषाच्या आई-वडिलांचे वकील नीरज गुप्ता यांनी या फोन संभाषणाला दुजोरा दिला आहे. 
प्रत्युषा ही राहुल राजवर नाराज होती. तसेच ती तणावामध्येही होती, असे तीन मिनिटांच्या या संभाषणामधून समोर आले आहे. " मी इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत केली आहे. मी येथे स्वत:ला विकण्यासाठी आले नव्हते. कलाकार म्हणून काम करण्यासाठी आले होते. पण आज तू मला कुठे आणून ठेवले आहेस. मला किती वाईट वाटतेय. याची तुला कल्पना नसेल," असे प्रत्युषाने  फोनवरील संभाषणात म्हटले आहे. 
(आत्महत्येपूर्वी प्रत्युषा बॅनर्जीने केला होता गर्भपात) 
(प्रत्युषा बॅनर्जीच्या आईने घेतली हायकोर्टात धाव)
 या संभाषणचा आधार घेत प्रत्युषाच्या आई-वडिलांचे वकील नीरज गुप्ता यांनी राहुलवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल हा प्रत्युषाला वाईट काम करण्यासाठी भाग पाडत होता, असे गुप्ता यांनी म्हटले आहे. राहुल राजवर प्रत्युषाला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप आहे. त्या आरोपाखाली त्या अटकही झाली होती. पण सध्या तो जामिनावर बाहेर आहे.  
 

Web Title: Rahul was pushing for a reaction against sex?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.