राहुल गांधी भिवंडीतील बाल सुधारगृह भेटीला

By Admin | Updated: May 9, 2015 23:12 IST2015-05-09T23:12:35+5:302015-05-09T23:12:35+5:30

शहरातील न्यायालयात शुक्रवारी तारखेस हजर राहिल्यानंतर राहुल गांधी यांनी कचेरीपाडा येथील बालसुधारगृहास भेट दिली

Rahul Gandhi visited the Children's Health Complex in Bhiwandi | राहुल गांधी भिवंडीतील बाल सुधारगृह भेटीला

राहुल गांधी भिवंडीतील बाल सुधारगृह भेटीला

भिवंडी : शहरातील न्यायालयात शुक्रवारी तारखेस हजर राहिल्यानंतर राहुल गांधी यांनी कचेरीपाडा येथील बालसुधारगृहास भेट दिली. बालसुधारगृहाचे अध्यक्ष दिलीप कलंत्री यांनी गांधी यांना बालसुधारगृहास भेट देण्यासाठी मेल केला होता.
भिवंडी कोर्टाचे कामकाज
संपवून आपल्या गाडीत वकील नारायण अय्यर यांना घेऊन ते बालसुधारगृहात गेले. त्या वेळी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील त्यांची सोबत केली. बालसुधारगृहातील मुलांची भेट घेऊन त्यांच्या जेवणाची व आरोग्याची त्यांनी विचारपूस केली.
तसेच बालसुधारगृहाबाबत माहिती घेतली. काँग्रेसचे माजी आमदार स्व. झुंबरलाल कलंत्री यांनी हे बालसुधारगृह स्थापन केल्याने त्यास भेट देण्याची विनंती दिलीप कलंत्री यांनी केली होती. बालसुधारगृहातील मुलांनी राहुल यांची भेट अविस्मरणीय ठरल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Rahul Gandhi visited the Children's Health Complex in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.