Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा शुक्रवारी टिळक भवनात सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 09:45 IST

दादर येथील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात सत्काराच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबई : देशभरात भीतीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती. म्हणूनच मुंबईत १ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.दादर येथील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात सत्काराच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खोटे आरोप करून त्यांची खासदारकी रद्द केली, त्यानंतर त्यांना सरकारी घरही खाली करावयास भाग पाडले, पण तरीही राहुल गांधी मागे हटले नाहीत. देशातील हुकूमशाही कारभाराला सडेतोड उत्तर देणाऱ्या काँग्रेसच्या या निडर योद्ध्याचा म्हणूनच सत्कार करीत आहोत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहतील, असेही पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :राहुल गांधी