राजकीय नेतृत्वामुळे तंत्रज्ञानात देश मागे - रघुनाथ माशेलकर

By Admin | Updated: August 10, 2014 02:42 IST2014-08-10T02:42:14+5:302014-08-10T02:42:14+5:30

तंत्रज्ञानाकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने आपण इतर देशांच्या तुलनेत तंत्रज्ञान आणि परदेशी गुंतवणुकीमध्ये मागे राहिलो, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे व्यक्त केली.

Raghunath Mashelkar: Country behind technology leadership due to political leadership | राजकीय नेतृत्वामुळे तंत्रज्ञानात देश मागे - रघुनाथ माशेलकर

राजकीय नेतृत्वामुळे तंत्रज्ञानात देश मागे - रघुनाथ माशेलकर

>मुंबई : गेल्या चार दशकांत देशातील राजकीय नेतृत्वाने समाजवादाला सर्वाधिक प्राधान्य दिले. परंतु तंत्रज्ञानाकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने आपण इतर देशांच्या तुलनेत तंत्रज्ञान आणि परदेशी गुंतवणुकीमध्ये मागे राहिलो, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे व्यक्त केली. तसेच गेल्या काही वर्षामध्ये या क्षेत्रंमध्ये भारताने चांगलीच प्रगती गाठल्याचेही माशेलकर यांनी या वेळी नमूद केले.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचा 52वा दीक्षान्त समारंभ शनिवारी आयआयटी दीक्षान्त सभागृहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणो म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी बोर्ड ऑफ गव्र्हनन्सचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक देवांग खक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्याथ्र्यानी केलेल्या संशोधनाचा फायदा हा विशिष्ट वर्गार्पयत मर्यादित न राहता, तो समाजातील तळागाळार्पयत पोहोचला पाहिजे. चांगले संशोधन झाले म्हणून विद्याथ्र्यानी समाधानी न राहता ती वस्तू गोरगरिबांना कशी परवडेल यासाठी प्रय} करावा, असा सल्लाही डॉ. माशेलकर यांनी विद्याथ्र्याना दिला.
उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा फायदा गोरगरिबांना करून द्यावा, असे आवाहन डॉ. माशेलकर यांनी केले. या वेळी 2 हजार 256 विद्याथ्र्याना पदवी प्रदान करण्यात आली; तर 227 विद्याथ्र्याना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक देवांग खक्कर यांनी इन्स्टिटय़ूटचा 2013-14चा अहवाल सादर केला. यंदा 8 विद्याथ्र्याना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. प्रेसिडंट ऑफ इंडिया मेडल इलेक्ट्रीक इंजिनीअरिंग विभागाचा विद्यार्थी राझ द्विवेदी याच्यासह इतर विद्याथ्र्याना प्रदान करण्यात आले. आयआयटी मुंबईसाठी योगदान देणारे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक दीपक फाटक यांचा लाइफटाइम अॅचिव्हमेंट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Raghunath Mashelkar: Country behind technology leadership due to political leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.