‘राधे माँ’वर प्रश्नांची सरबत्ती

By Admin | Updated: August 20, 2015 02:10 IST2015-08-20T02:10:44+5:302015-08-20T02:10:44+5:30

हुंडाप्रकरणी आरोप असलेली स्वयंघोषित देवी राधे माँ बुधवारी कांदिवली पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी काही निवडक भक्त तिच्यासोबत होते.

'Radhe Maa' questions on the racket | ‘राधे माँ’वर प्रश्नांची सरबत्ती

‘राधे माँ’वर प्रश्नांची सरबत्ती

मुंबई : हुंडाप्रकरणी आरोप असलेली स्वयंघोषित देवी राधे माँ बुधवारी कांदिवली पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी काही निवडक भक्त तिच्यासोबत होते. यावेळी पोलिसांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ४० मिनिटांत २३ प्रश्न विचारल्याची माहिती कांदिवली पोलिसांकडून मिळाली.
राधे माँ जवळपास साडेबाराच्या सुमारास पोलीस ठाण्यात दाखल झाली. राधे माँ जवळपास ४० मिनिटे पोलीस ठाण्यात होती. तिने सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्वीप्रमाणेच अत्यंत शांतपणे दिली. तुम्ही पैशांची मागणी केली होती का? तुम्ही दागिन्यांची मागणी केलेली का? तुमच्याकडे किती संपत्ती आहे आणि ती कुठे आहे? पंजाबमध्ये तुमचे घर आहे का? पंजाबमध्ये तुमचे येणे-जाणे असते का? डॅडी कोण आहे? तुमचे त्यांच्यासोबत नाते काय? असे प्रश्न पोलिसांनी विचारले.
बुधवारीदेखील तिने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. डॅडी माझा नवरा आहे, तसेच माझ्या नावावर संपत्ती नसून मी माझ्या भक्तांच्या घरी राहते, असेही तिने यावेळी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे पासपोर्ट विवरणदेखील सादर करण्यास सांगितले आहे.
निकी गुप्ता (३२) या तरुणीने तिच्या सासरच्या मंडळींसह राधे माँवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात राधे माँची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Radhe Maa' questions on the racket