आर सिटी मॉलवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 29, 2015 02:17 IST2015-07-29T02:17:12+5:302015-07-29T02:17:12+5:30
अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईतील मॉल व्यवस्थापन सुरक्षेकडे कानाडोळा करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. सुरक्षेत हलगर्जीपणा आढळल्याने कुर्ला येथील

आर सिटी मॉलवर गुन्हा दाखल
मुंबई : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईतील मॉल व्यवस्थापन सुरक्षेकडे कानाडोळा करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. सुरक्षेत हलगर्जीपणा आढळल्याने कुर्ला येथील फिनिक्स मॉल पाठोपाठ घाटकोपरच्या आर सिटी मालविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. पार्क साईट पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या गार्डला अटक केली आहे.
मुंबईत झालेल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या सुनावणीनंतर पाठिंब्याबरोबर विरोधाचे वारेही जोर धरु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी केला. या पार्श्वभुमीवर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून मॉल सुरक्षेकडेही भर देण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार परिमंडळ ७ चे डिसीपी विनयकुमार राठोड यांनी त्यांच्या परिमंडळातील स्थानिक पोलिसांना मॉलची तपासणी करण्यास सांगितले. सुरुवातीला परिसरातील मॉलची पाहणी करुन त्यातील ढिसाळपणा मॉल व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देण्यात आला
होता. मात्र एवढे करुनही मॉल व्यवस्थापन सुचनांचे पालन करत नसल्याचे समोर आले. २४ जुलै रोजी घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश पाटील यांनी फिनिक्स मॉलमध्ये सुरक्षेत ढिसाळपणा आढळल्याने गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)