प्रदूषण रोखण्यासाठी शीघ्र कृती पथक

By Admin | Updated: March 13, 2015 22:53 IST2015-03-13T22:53:04+5:302015-03-13T22:53:04+5:30

महाराष्ट्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या तारापूर एम.आय.डी.सी मधील भयावह प्रदूषण नियंत्रणात आणण्याकरीता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे

Quick Action Squad to Prevent Pollution | प्रदूषण रोखण्यासाठी शीघ्र कृती पथक

प्रदूषण रोखण्यासाठी शीघ्र कृती पथक

बोईसर : महाराष्ट्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या तारापूर एम.आय.डी.सी मधील भयावह प्रदूषण नियंत्रणात आणण्याकरीता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व संबंधीत यंत्रणा अपयशी ठरत असल्याने त्याचा विपरीत परिणाम शेती, जमीनी, कुपनलीका, पारंपारीक मच्छीमारी, तसेच आरोग्यावर होतो आहे. प्रदुषणासंदर्भात नियम पायदळी तुडविणाऱ्या उद्योगांवर नियंत्रण आणून जरब बसविण्यासाठी शीघ्र कृत दल स्थापन केले जावे, अशी मागणी पर्यावरण दक्षता मंच आणि कोलवडेच्या ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात पर्यावरण दक्षता मंचचे अध्यक्ष मनिष संखे, कोलवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना संखे, उपसरपंच हेमलता संखे, सदस्य मधुकर पिंपळे व वंदिता पिंपळे तसेच ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे इ. नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी एम. आय. डी. सी. च्या तारापूर विभागाचे उपअभियंता व बोईसर पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रदूषणावर नियंत्रण आणण्याकरीता शिघ्र कृती पथकाची स्थापना करण्यासंदर्भात निवेदन दिले.
या निवेदनात तारापूर एम.आय.डी.सी. मध्ये वाढत असलेले रासायनिक सांडपाणी तसेच हवा आणि ध्वनीप्रदूषणामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. या विरोधात शिघ्र गतीने कार्यवाही करून संबंधीत यंत्रणेने कारवाई करण्यासाठी प्रत्यक्षात जे प्रदूषण पिडीत आहेत त्या त्या गावातील जाणकार व जबाबदार व्यक्ती म. प्र. नि. मंडळ व एम.आय.डी. सी. चे अधिकारी व बोईसर पोलीस स्थानकाचे अधिकारी व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी इ. सर्वांना एकत्रित करून या पथकाची स्थापना करावी जेणेकरून प्रदूषण होत असलेल्या ठिकाणी हे पथक शिघ्र गतीने पोहचून प्रदूषण करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करेल. त्यामुळे काही प्रमाणावर प्रदूषण नियंत्रणास गती मिळून नागरीकांना सुखाने जगता येईल. (वार्ताहर)

Web Title: Quick Action Squad to Prevent Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.