कर्जतच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पा दगडे
By Admin | Updated: January 21, 2015 22:39 IST2015-01-21T22:39:52+5:302015-01-21T22:39:52+5:30
कर्जत नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, उपनगराध्यक्ष लालधारी पाल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूकजाहीर झाली होती.

कर्जतच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पा दगडे
कर्जत : कर्जत नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, उपनगराध्यक्ष लालधारी पाल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूकजाहीर झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
लालधारी पाल यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली होती. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पुष्पा दगडे तर शिवसेना -भाजपा - आरपीआय महायुतीतर्फे शिवसेनेच्या यमुताई विचारे यांनी अर्ज दाखल केले होते. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पुष्पा दगडे यांनी दोन अर्ज तर यमुताई विचारे यांनी एक अर्ज असे दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले होते. छाननीत तीनही अर्ज वैध ठरले. यमुताई विचारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पीठासीन अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी पुष्पा दगडे या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
या निवडणुकीत मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)