Join us  

खरेदी झाली सोपी; आव्हाने मात्र मोठी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 5:10 AM

नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारपेठेचे स्वरूप बदलले असले, तरी ग्राहकांपुढे आव्हाने निर्माण झाली आहेत.

- अ‍ॅड. शिरीष देशपांडे नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारपेठेचे स्वरूप बदलले असले, तरी ग्राहकांपुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. आज पेन-पेन्सीलपासून घर खरेदीपर्यंतचा पारंपरिक पॅटर्न बदलला आहे. एका क्लिकवर वस्तू खरेदी करणे शक्य झाले आहे. मात्र, मार्केट दाराशी आले असले, तरी ऑनलाइन ठगही दार ठोठावत आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. १५ मार्चला साजऱ्या होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त या सर्वघडामोडींचा हा ऊहापोह...पूर्र्वी एखादी वस्तू खरेदी करायची म्हटल्यावर बाजारात जाणे, ती न्याहाळणे, निवडणे, दरात घासाघीस करणे आणि मगच ती खरेदी करणे हे ठरलेले असायचे. मात्र, आज घरबसल्या एका क्लिकवर कोणतीही वस्तू खरेदी करता येते. म्हणजे असे की, उद्या मला मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे. त्याच्यासाठी भेटवस्तू खरेदी करायची आहे. मग त्यासाठी बाजारात जाण्याची गरज उरली नाही. ती ऑनलाइन खरेदी करता येते.सुलभता जरी आलेली असली, तरी प्रत्येक वयाच्या ग्राहकाला ऑनलाइन खरेदी पद्धत सहजरीत्या हाताळता येतेच असे नाही. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा जास्त फटका बसतो. त्यामुळे खरेदीचे तंत्र बदलले असले, तरी ते आत्मसात करणे हे नवे आव्हान ग्राहकांपुढे उभे राहिले आहे. याउलट तंत्रज्ञानाचा वापर शिकला नाहीत, तर तुम्ही बाजारातून आउटडेटेट व्हाल, अशी सद्यस्थिती आहे.दुसरे आव्हान हे की ऑनलाइन खरेदी झाल्यावर कराव्या लागणाºया आर्थिक व्यवहारांचे! ऑनलाइन व्यवहार करताना बºयाच ग्राहकांना गंडा घातल्याचे प्रकारही बºयाच प्रकरणांत उघड झाले आहेत. पूर्वी खरेदी करताना व्यापारी आणि किराणा दुकानदार तुमच्यासमोर असायचा. सध्या बिनचेहºयाची (ऑनलाइन) खरेदी होते. तुम्ही कोणाला खरेदीची ऑर्डर देताय, हे तुम्हालाच माहिती नसते. त्यामुळे ‘ऑनलाइन तंत्र कसे वापरायचे?’ हे आव्हानही आहे.बºयाच वेळेला आपण ऑर्डर देतो एक आणि वस्तू येते दुसरी. अशा वेळी तक्रार कुठे, कशी आणि कोणाकडे करायची, हेच ग्राहकांना माहिती नसते. ऑनलाइनमध्ये रिफंड पॉलिसीसुद्धा असते. एखादी वस्तू आवडली नाही, तर ती तुम्ही बदलून घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा तुम्ही ऑनलाइन व्यवहार करता, त्याला देशाच्या सीमा नसतात. त्यामुळे ई-कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर देशांतर्गत काही नियम व अटी लागू करता येतील का? यावर आंतराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. यात मुंबई ग्राहक पंचायत आघाडीवर आहे.दुसरीकडे, ग्राहकांमध्ये डेटा प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन ही नवी आवाहने समोर येऊन ठेपली आहेत, तंत्रज्ञान अती प्रगत झाले आहे. बाजारात सुविधा खूप आहेत, परंतु ग्राहक गोंधळला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाला सामोरे जाण्यासाठी ग्राहक शिक्षणाची नितांत गरज आहे. ते कार्य ग्राहक पंचायतीने हाती घेतले आहे. ते ग्राहकांत सजगता निर्माण करण्यासाठी वेगवेगळी शिबिरे आयोजित करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई ग्राहक पंचायत या विषयी सजग आहे.(लेखक मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष आहेत.)(शब्दांकन - सागर नेवरेकर)

टॅग्स :ऑनलाइन