२३ हजार क्विंटल भाताची खरेदी !

By Admin | Updated: December 27, 2014 22:35 IST2014-12-27T22:35:35+5:302014-12-27T22:35:35+5:30

पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे भाताचे उत्पादन मोठ्याप्रमाणात झाले आहे. या भाताच्या खरेदीसाठी ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये ४१ भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Purchase 23 thousand quintals of rice! | २३ हजार क्विंटल भाताची खरेदी !

२३ हजार क्विंटल भाताची खरेदी !

सुरेश लोखंडे ल्ल ठाणे
पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे भाताचे उत्पादन मोठ्याप्रमाणात झाले आहे. या भाताच्या खरेदीसाठी ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये ४१ भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांव्दारे सुमारे ७० ते ७५ हजार क्ंिवटल भाताच्या खरेदीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत २३ हजार ७१९ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आल्याचे आदिवासी विकास महामंडळाव्दारे नमूद करण्यात आले आहे.
आदिवासी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी एकाधिकार व आधारभूत या दोन योजनांव्दारे केली जात आहे. आधारभूत केंद्रांसाठी केंद्र शासनाने भाताच्या ‘अ’ ग्रेडसाठी १४०० रूपये तर ‘बी’ग्रेड भातासाठी १३६० रूपये क्विंटलप्रमाणे भात खरेदी दर निश्चित केला आहे. याशिवाय राज्य शासनाच्या एकाधिकार योजनेच्या भात खरेदीचा दर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सुमारे १६२५ ते १५०० रूपये क्विंटल दर निश्चित केलेला आहे. याव्दारे आठवड्याभरात भाताची खरेदी करण्यात आली आहे. पुढील आठवडयात एकाधिकारी योजनेच्या भात खरेदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आदिवासी विकास महामंडळाव्दारे आदिवासी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडून भातासह अन्यही धान्याची खरेदी केली जात आहे. यासाठी पालघर जिल्ह्यात सुमारे ३२, तर ठाणे जिल्ह्यात सुमारे आठ आणि रायगडमधील कर्जत परिसरात एक भात खरेदी क्रेंद्र अशी सुमारे ४१ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे २३ हजार ७१९ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांना तीन कोटी रूपये देखील वाटप करण्यात आले आहे.
या वर्षभरात सुमारे ७० ते ७५ हजार क्विंटल पेक्षात जास्त भाताची खरेदी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी सुमारे ९० हजार क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली होती. आधारभूत भात खरेदीव्दारे ‘अ’ गे्रडच्या भाताचा दर १४०० रूपये निश्चित करण्यात आलेला आहे. या ग्रेडचा भात ठाणे, पालघर जिल्ह्यात होत नसल्यामुळे या दराचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. परंतु शेतकऱ्यांकडून ‘बी’ग्रेडच्या भाताचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होत असल्यामुळे सुमारे १३६० रूपये क्ंिवटल या दराने शेतकऱ्यांना भाताची विक्री करावी लागत आहे.
भात खरेदीसाठी पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर, डहाणू, तलासरी या सात तालुक्यांमध्ये सर्वाधिक ३१ भात खरेदी केंद्र सुरू केली आहेत.
या सर्व तालुक्यात एकाधिकार योजनेव्दारे भाताची खरेदी होत आहे. यामुळे चांगल्या भातासाठी शेतकऱ्यांना सुमारे १६२५ रूपये क्विंटल तर या खालोखाल दर्जाच्या भाताला सुमारे १५०० रूपये क्विंटल दराने शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी केली जात असल्याचे आदिवासी विभागाने नमुद केले
आहे.

धान्यदर (")
वरई२६९०
नागली१५५५
खरासणी३९००
तूर४०००
उडीद४१००
भात ‘अ‘ १६२५
भात रत्नागिरी को.१६२५

धान्यदर (")
भात रत्नागिरी१५००
भात सोलम१५००
कर्जत १८४१५००
गुजरात१११५००
भात मसुरी बी१३७०
भात सुवर्णा१३७०
भात सी ग्रेड१२००

Web Title: Purchase 23 thousand quintals of rice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.