अश्लील चॅटिंग करणाऱ्या पुण्याच्या तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:32 IST2018-06-03T02:32:44+5:302018-06-03T02:32:44+5:30

१७ वर्षांच्या तरुणीला ‘इन्स्टाग्राम’वर अश्लील मेसेजेस पाठविणाºया कैलाश घायल (२७) याला खेरवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. खारमधील एका तरुणीशी तो काही दिवसांपासून अश्लील मॅसेज पाठवून शरीरसंबंधाची मागणी करीत होता.

 Pune youth arrested for sexually assaulting girls | अश्लील चॅटिंग करणाऱ्या पुण्याच्या तरुणाला अटक

अश्लील चॅटिंग करणाऱ्या पुण्याच्या तरुणाला अटक

मुंबई : १७ वर्षांच्या तरुणीला ‘इन्स्टाग्राम’वर अश्लील मेसेजेस पाठविणाºया कैलाश घायल (२७) याला खेरवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. खारमधील एका तरुणीशी तो काही दिवसांपासून अश्लील मॅसेज पाठवून शरीरसंबंधाची मागणी करीत होता. याप्रकरणी पीडितेच्या आईने दाखविलेल्या धाडसामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
एका बिल्डरकडे काम
करीत असलेल्या कैलाशने ‘इन्स्टाग्राम’वर अकाऊंट उघडून
स्वत: मोठा व्यावसायिक असल्याचे नमूद केले होते. अनेक मुलींसोबत
चॅट करीत त्यांच्याकडून तो शारीरिक संबंधांचीदेखील मागणी करायचा. काही दिवसांपूर्वी तो खारमध्ये राहत असलेल्या युवतीच्या संपर्कात आला. तिच्याकडे स्वत:चा मोबाइल नव्हता, त्यामुळे ती आईच्या फोनवरून मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात होती. या मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यावर, तिने त्या युवकाला धडा शिकविण्याचे ठरविले. त्यानंतर, त्याच्याशी चॅट करायला सुरुवात केली. घायलने संबंधित तरुणी
चॅट करत असल्याचे समजून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. त्याबाबत मुलीच्या आईने
खेरवाडी पोलीस ठाण्यात
तक्रार दाखल केली. त्यानंतर, एका महिला कॉन्स्टेबलने त्याच्याशी
संपर्क साधून गोड बोलत, पुण्यातून मुंबईत दादरच्या स्वामी नारायण मंदिरकडे बोलावले, या ठिकाणी आल्यानंतर त्याला अटक केली. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Pune youth arrested for sexually assaulting girls

टॅग्स :Arrestअटक