Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Terror Attack : सिद्धिविनायक ट्रस्टकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 20:21 IST

आता मुंबईतील प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे.

ठळक मुद्देपुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले.ही घटना घडल्यानंतर देशभरात शोककळा पसरली होती. दरम्यान, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची एक बैठक घेण्यात आली.

मुंबई - प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून पुलावामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळला. देशभरातून कँडल मार्च, रॅली काढून या आतंकवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. आता मुंबईतील प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे.

ही घटना घडल्यानंतर देशभरात शोककळा पसरली होती. दरम्यान, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरपुलवामा दहशतवादी हल्ला