सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

By Admin | Updated: October 9, 2014 00:20 IST2014-10-09T00:20:55+5:302014-10-09T00:20:55+5:30

लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता विधानसभेतही सर्वपक्षीय उमेदवारांनी याच सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

Publicity campaign on social media | सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

अजित मांडके, ठाणे
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता विधानसभेतही सर्वपक्षीय उमेदवारांनी याच सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, गुगल, व्हॉटस्अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावर सर्वपक्षीय उमेदवार सक्रिय झाले असून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि लाइक्स मिळाल्या आहेत. अधिकाधिक तरुणांनी त्यांचे प्रोफाइल जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. त्यामुळे आता इतर पक्षांचे उमेदवारदेखील फेसबुक आणि टिष्ट्वटरवर सक्रिय होताना दिसत असून फेसबुक आणि इतर माध्यमांवर संदेश आणि चित्रफीत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता फेसबुक आणि टिष्ट्वटरवर सर्वपक्षीयांचे सोशल मीडिया युद्ध रंगल्याचे चित्र तयार झाले आहे.
ठाणे शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत यंदा चुरशीच्या लढती होणार आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाची लढत ही एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत. लोकसभेत सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे आता याच माध्यमाचा अधिक वापर करून मतदारांना आकर्षित करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. यासाठी जवळजवळ सर्व पक्षांनी आपल्या प्रचार कार्यालयांमध्ये पाच ते दहा जणांची टीमच तयार करून एक सोशल मीडियाचा सेल तयार केला आहे. या सेलच्या माध्यमातून उमेदवाराचा रोजचा प्रचार, नवीन पक्ष प्रवेश, उमेदवाराने मतदारसंघात केलेली कामे, त्याला मिळणारा विविध संस्था व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा, रॅली, मेळावे, भाषणे, आश्वासने, त्यांचा अजेंडा हा रोजच्या रोज अपडेट केला जात आहे. तसेच उमेदवारांविषयी मतदारांना काय वाटते, यासंदर्भात मत नोंदवण्याचे आवाहनदेखील फेसबुकवर करण्यात येत आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या फेसबुकवरील प्रोफाइलला आतापर्यंत सर्वाधिक २ लाख ८७६ लाइक मिळाल्या आहेत. शिवसेनेचे रवींद्र फाटक यापूर्वी आपले फेसबुक अकाउंट अपडेट करत नसले तरी आता तेदेखील यात सक्रिय झाले असून त्यांना आतापर्यंत १ लाख ३० हजार लाइक मिळाल्या आहेत. त्यानंतर, प्रताप सरनाईक यांच्या प्रोफाइलला ५५ हजार ४८७ लाइक मिळाल्या आहेत. परंतु, आता थोड्या उशिराने का होईना या उमेदवारांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर उमेदवारही या माध्यमांचा आधार घेत सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही उमेदवारांचे दोन किंवा तीन प्रोफाइल असल्यामुळे खरे प्रोफाइल कोणते, याबाबत तरुणाईत मात्र साशंकता आहे.
आजकाल कृत्रीम लाईक्स मॅनेज करणाऱ्या वेबसाईस्ट निघाल्या आहेत त्यामुळे खऱ्या वाटाव्या अशा लाईक्स या साईट निर्माण करतात. परिणामी खऱ्या लाईक्स कुठल्या आणि कृत्रीमरित्या तयार केलेल्या लाईक्स कुठल्या हे कळत नाही. असाही प्रकार घडतो आहे.
व्हॉटस्अ‍ॅपचा वापर सगळ््यात जास्त होतो आहे. कार्यकर्ते आणि प्रचारप्रमुख यांच्यातील संपर्कासाठी त्यांचा वाढत्याप्रमाणावर वापर सुरू आहे. फोटो आणि प्रचारवृत्त याच्या प्रसारासाठी व्हॉटस्अ‍ॅपचा वापर सुरू आहे. त्यामध्ये तरुणाईदेखील हिरीरिने सहभागी होते आहे.

Web Title: Publicity campaign on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.