वेस्टर्न.....महापौरांच्या भाषण पुस्तकाचे प्रकाशन

By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:27+5:302014-08-31T22:51:27+5:30

वेस्टर्नसाठी....

The publication of the Western Mayor's speech book | वेस्टर्न.....महापौरांच्या भाषण पुस्तकाचे प्रकाशन

वेस्टर्न.....महापौरांच्या भाषण पुस्तकाचे प्रकाशन

स्टर्नसाठी....
फोटो मेलवर आहेत...

महापौरांच्या भाषण पुस्तकाचे
उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन

वांद्रे: आजपर्यंत महापौरांच्या भाषणाचा संग्रह प्रकाशित झाल्याचे माझ्या ऐकीवात नाही, त्यामुळे हा भाषणांचा संग्रह अनेकांना मार्गदर्शक ठरेल, असे भावोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेत. महापौर सुनील प्रभू यांच्या मुंबईकर बंधु-भगिनींनो या निवडक भाषणाच्या संग्रहाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी मुंबापुरी ही कशी संपूर्ण जगात वेगळी ठरली हे महापौर सुनील प्रभू यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विविध विषयांवर केलेली त्यांची भाषणे या संग्रहात समाविष्ट करण्यात आली आहेत. पुस्तकाची प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखिका व मराठी विश्वकोष महामंडळाच्या अध्यक्षा विजया वाड यांनी लिहिली आहे. या पुस्तक प्रकाशनप्रसंगी खा. राहुल शेवाळे, सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव व स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The publication of the Western Mayor's speech book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.