शासकीय योजनांची कलापथकांद्वारे जनजागृती

By Admin | Updated: December 26, 2014 22:46 IST2014-12-26T22:46:49+5:302014-12-26T22:46:49+5:30

अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत म्हणजे विशेष घटक योजनेंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना ग्रामीण भागातील संबंधितांपर्यंत नेण्यासाठी कलापथकांद्वारे

Public awareness through the art of government schemes | शासकीय योजनांची कलापथकांद्वारे जनजागृती

शासकीय योजनांची कलापथकांद्वारे जनजागृती

ठाणे : अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत म्हणजे विशेष घटक योजनेंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना ग्रामीण भागातील संबंधितांपर्यंत नेण्यासाठी कलापथकांद्वारे पालघर जिल्ह्यात जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कलापथकांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम जिल्ह्यातील बहुतांशी आदिवासी, दुर्गम भागातील खेड्यापाड्यांत घेतले जाणार आहेत. त्यांच्या बोलीभाषेत कार्यक्रम घेऊन कलापथकांतील कलाकार अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देणार आहेत. मनोरंजनाबरोबर योजनेचे स्वरूप संबंधित लाभार्थ्यांना आकलन करून देण्याच्या दृष्टीने कलापथकांद्वारे कला सादर केली जाणार आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार या चार तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत शासकीय योजना सादर होणार आहेत. १ ते २५ जानेवारी दरम्यान कलापथकांच्या माध्यमातून विविध योजना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लोकांपर्यंत नेण्याची नामी युक्ती जिल्हा प्रशासनाने शोधून काढली आहे.

Web Title: Public awareness through the art of government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.