नवी मुंबईत स्वाइनबाबत जनजागृती सुरू

By Admin | Updated: February 13, 2015 04:46 IST2015-02-13T04:46:07+5:302015-02-13T04:46:07+5:30

मुंबईसह नवी मुंबईतही स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण नवी मुंबईतही आढल्यामुळे पालिका प्रशासनाने जनजागृती मोहिम सुरू केली आहे

Public awareness about swine in Navi Mumbai | नवी मुंबईत स्वाइनबाबत जनजागृती सुरू

नवी मुंबईत स्वाइनबाबत जनजागृती सुरू

नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबईतही स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण नवी मुंबईतही आढल्यामुळे पालिका प्रशासनाने जनजागृती मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शहरात २७ ठिकाणी स्क्रिनींग सेंटर सुरू केली आहेत.
नवी मुंबईमध्ये स्वाईनची साथ मोठ्याप्रमाणात पसरु नये यासाठी पालिका प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. महापालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालय व नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयामध्ये आंतररूग्ण विभाग सुरू केला आहे. आवश्यक ती सर्व औषधांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. खाजगी रूग्णालयांमधील डॉक्टरांनाही निदान व उपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हँडबिल, पोस्टर्स, वर्तमानपत्र व सिनेमागृहात जाहिरात करून जनजागृतीस सुरवात केली आहे.
दरम्यान महापौर सागर नाईक यांनी स्वाइनबाबत गुरुवारी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. नागरिकांनी योग्य ती काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूपासून बचाव करता येईल. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास महापालिकेचे रूग्णालय व नागरी आरोग्य केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Public awareness about swine in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.