माथाडी कामगार कायद्याविषयी जनजागृती
By Admin | Updated: August 29, 2014 00:51 IST2014-08-29T00:51:15+5:302014-08-29T00:51:15+5:30
माथाडी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यशोदा महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थी, नागरिक, सार्वजनिक ठिकाणी, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये मोफत हा उपक्रम सुरू केला आहे.

माथाडी कामगार कायद्याविषयी जनजागृती
नवी मुंबई : माथाडी कायद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना कायद्यातील सर्व माहिती कळावी यासाठी यशोदा महिला मंडळाच्या वतीने आज कोपरखैरणे येथील रा.फ. नाईक महाविद्यालयात दी ग्रेट माथाडी हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला.
माथाडी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यशोदा महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थी, नागरिक, सार्वजनिक ठिकाणी, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये मोफत हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत माथाडी कायद्याविषयीची माहिती लोकांना सांगण्यात येत आहे. तसेच माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनावर आधारित दी ग्रेट माथाडी हा चित्रपट मोफत दाखविण्यात येत आहे. रा.फ. नाईक महाविद्यालयातील माथाडी कामगारांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांनाही कायद्याविषयी माहिती मिळावी यासाठी आज मोफत चित्रपट दाखविण्यात आला.
तळागाळातील लोकांपर्यंत माथाडी कायद्याविषयी माहिती कळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दी ग्रेट माथाडी चित्रपट मोफत दाखविण्यात येत असल्याचे यशोदा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री हणुमंतराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी रा.फ. नाईक महाविद्यालयातील शिक्षक प्रताप महाडिक, इतर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)