गणेशोत्सवात ई-कचर्याबाबत जनजागृती!
By Admin | Updated: August 31, 2015 00:23 IST2015-08-31T00:23:30+5:302015-08-31T00:23:30+5:30
गणेशोत्सवात ई-कचर्याबाबत जनजागृती!

गणेशोत्सवात ई-कचर्याबाबत जनजागृती!
ग ेशोत्सवात ई-कचर्याबाबत जनजागृती!मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान महापालिकेने मंडळांना निर्माल्य एका ठिकाणी गोळा करण्याच्या सूचना दिल्या असतानाच आता पर्यावरण रक्षणासाठी उत्सवावेळी ई-कचर्याबाबतही पुरेशी जनजागृती करण्यात येणार आहे.हयुनिटी फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला असून, ई-कचर्याच्या वाढत्या समस्येला थोपविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे संस्थेचे पदाधिकारी संजय शिंगे यांनी सांगितले. ई-कचर्याबाबत पुरेशी जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता ई-कचरा संकलन मोहीम आयोजित करण्यात आली आहे. मोहीमेदरम्यान मंडळांनी आपल्याकडील ई-कचरा म्हणजे जूने-बंद पडलेले दूरध्वनी संच, मोबाईल, संगणक, बॅटरी इत्यादी संकलित करून संस्थेला द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर हा ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मान्यताप्राप्त संस्थेकडे विल्हेवाट लावण्यासाठी सुपुर्द करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)......................