Join us  

तोतया पीएसआयचे हस्ताक्षर मागविले, मुंबईत दोन विक्रीकर अधिका-यांसह सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 4:04 AM

डमी उमेदवार बसवून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन कॉन्स्टेबल्सच्या हस्ताक्षरांचे नमुने राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने (सीआयडी) नागपूर ग्रामीण पोलिसांकडून मागविले आहेत. त्या हस्ताक्षराची फोरेन्सिक लॅबकडून पडताळणी केली जाणार असून, त्याच्या अहवालानंतर संबंधितावर कार्यवाही केली जाईल.

जमीर काझी मुंबई : डमी उमेदवार बसवून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन कॉन्स्टेबल्सच्या हस्ताक्षरांचे नमुने राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने (सीआयडी) नागपूर ग्रामीण पोलिसांकडून मागविले आहेत. त्या हस्ताक्षराची फोरेन्सिक लॅबकडून पडताळणी केली जाणार असून, त्याच्या अहवालानंतर संबंधितावर कार्यवाही केली जाईल.राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसविण्याचा गोरख धंदा गेल्या ९ वर्षांपासून सुरू असल्याचे तपासातून पुढे आले आहे. नांदेडमध्ये मुख्य केंद्र असलेल्या भरती रॅकेटचा लाभ घेत, अनेकांनी विविध विभागांत उच्च पदे मिळविली आहेत. राज्यभर त्याची व्याप्ती असून, या प्रकरणी सीआयडी व मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये प्रत्येकी ३ पोलीस अधिकारी व विक्रीकर अधिकाºयांचा समावेश आहे. भायखळा पोलिसांनी दोघा विक्रीकर निरीक्षकांसह सहाजणांना अटक केली आहे.आयोगामार्फत २०१६मध्ये झालेल्या उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतील ८२८ उत्तीर्ण उमेदवारांचे, गेल्या ५ जानेवारीपासून नाशिक पोलीस अकादमीत प्रशिक्षण सुरू आहे. त्यामध्ये नागपूर ग्रामीण येथील कॉन्स्टेबल धनंजय फरतडे व नरेंद्र नाईक हे डमी उमेदवार बसून परीक्षा पास झाल्याचा आरोप आहे. भरती प्रकरणात अटकेत असलेल्या सोमनाथ पारवे-पाटील याने त्यांची नावे तपासात उघड केली आहेत. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. त्यानंतर, या प्रकरणाचा तपास करणाºया सीआयडीच्या तपास अधिकाºयांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून, फरतडे व नाईक यांच्या हस्ताक्षराचे नमुने मागविले आहेत. त्याच्या पडताळणीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.दरम्यान, या बनावट नोकर भरतीचा मूळ सूत्रधार मांडवी (जि.नांदेड) येथील प्रबोध मधुकर राठोड हा असून, तो परभणी पंचायत समितीमध्ये वरिष्ठ लिपिक होता. त्याने काही अधिकाºयांना हाताशी धरून स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसविण्याचे व लाखो रुपये उकळण्याचे काम सुरू केले. २००९ पासून हा गैरप्रकार सुरू असून, आतापर्यंत विविध सरकारी विभागांतील पदाच्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा अधिकाºयांचा संशय आहे. या रॅकेटमध्ये आतापर्यंत ४९ जणांची नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये सीआयडीने राठोड, तसेच ३ पोलीस अधिकाºयांसह ९ जणांना अटक केली आहे, तर मुंबईतील भायखळा पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.३१ डिसेंबरला मुंबईतविक्रीकर निरीक्षकाच्या परीक्षेतसंदीप भुसारी व सचिन नराळे हे दोघे दुसºया उमेदवाराच्या नावावर पेपर सोडवित असताना, भायखळा पोलिसांनी अटक केली. दोघेजण विक्रीकर निरीक्षक असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कर सहायक अधिकारी गोविंद चेमबोले लातूरमधील नरसिंह बिरासदार यांना अटक केली आहे, तर सूत्रधार अनंत कोलेवाड याच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.संशयितांचा शोध सुरूभरती रॅकेटमध्ये मांडवीतील प्रबोध मधुकर राठोड हा एक प्रमुख सूत्रधार असून, त्याला अटक करण्यात आली आहे. यामध्ये गुंतलेल्या अन्य संशियतांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात मांडवी (नांदेड) येथे संस्थाचालक असलेल्या प्रफुल्ल राठोड नावाच्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही, असे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.नागपूर ग्रामीण येथील कॉन्स्टेबल धनंजय फरतडे व नरेंद्र नाईक हे डमी उमेदवार बसून परीक्षा पास झाल्याचा आरोप आहे. भरती प्रकरणात अटकेत असलेल्या सोमनाथ पारवे-पाटील याने त्यांची नावे तपासात उघड केली.सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका-राज्यव्यापी भरती रॅकेटचा पर्दापाश मांडवी (नांदेड) येथील योगेश जाधव या तरुणाने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास गेल्या वर्षी मार्चमध्ये सीआयडीकडे वर्ग केला.मात्र, या रॅकेटमध्ये विविध शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाºयांचा सहभाग आहे. त्यामुळे तपास योग्य व पारदर्शी होण्यासाठी तो सीबीआयमार्फत करण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.... तर कारवाई होणारदोन कॉन्स्टेबल्सची चौकशी करून हस्ताक्षराचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर, नागपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे त्यांचे हस्ताक्षर असलेली कागदपत्रे मागविली आहेत. याशिवाय २०१६च्या पीएसआयच्या परीक्षेतील त्यांच्या उत्तरपत्रिकांची फॉरेन्सिक लॅबकडून पडताळणी केली जाईल. त्याच्या अहवालात हस्ताक्षर वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाल्यास, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.- शंकर केंगार (अधीक्षक, विशेष तपास पथक, सीआयडी.)

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्र