‘नियुक्त कंत्राटदाराकडूनच वृक्ष छाटणी करा’

By Admin | Updated: May 22, 2014 03:24 IST2014-05-22T03:24:10+5:302014-05-22T03:24:10+5:30

निवासी सोसायट्यांमध्ये वास्तव्य करणार्‍या नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसांत वृक्षांच्या फांद्या तसेच वृक्षतोड खासगी कंत्राटदाराकडून करून घेऊ नये

'Pruning the tree from an appointed contractor' | ‘नियुक्त कंत्राटदाराकडूनच वृक्ष छाटणी करा’

‘नियुक्त कंत्राटदाराकडूनच वृक्ष छाटणी करा’

मुंबई : निवासी सोसायट्यांमध्ये वास्तव्य करणार्‍या नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसांत वृक्षांच्या फांद्या तसेच वृक्षतोड खासगी कंत्राटदाराकडून करून घेऊ नये, तर मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या विभागनिहाय कंत्राटदारकडून वृक्षतोड करून घ्यावी, असे आवाहन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मुंबईकरांना केले आहे. पालिकेने २४ विभागीय कार्यालयांमध्ये वृक्षतोडीकरिता कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. निवासी सोसायट्यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांत अर्ज करून, त्या खर्चाची रक्कम भरल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या वतीने वृक्षतोडीची कार्यवाही संबंधित ठिकाणी करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना खासगी कंत्राटदराला द्यावयाच्या रकम वाचेल.

Web Title: 'Pruning the tree from an appointed contractor'