'कोसळण्याच्या अवस्थेत असलेल्या झाडाची छाटणी करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:34 IST2019-08-09T01:33:59+5:302019-08-09T01:34:04+5:30

महापालिकेची रेल्वेला नोटीस : दिरंगाई झाल्यास जबाबदारी प्रशासनाची

Prune the tree in a collapsed state | 'कोसळण्याच्या अवस्थेत असलेल्या झाडाची छाटणी करा'

'कोसळण्याच्या अवस्थेत असलेल्या झाडाची छाटणी करा'

मुंबई : फोर्ट येथील बेस्ट बस स्थानकालगतच्या नगर चौकातील झाड कोसळण्याच्या अवस्थेत असून, ते कोसळण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी आणि या झाडाची छाटणी करावी, अशा आशयाची नोटीस मुंबई महापालिकेने रेल्वेला बजावली आहे.
महापालिकेच्या नोटीसनुसार हे झाड रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत आहे. महापालिका कार्यालयासमोरील झाड कोसळण्याच्या अवस्थेत आहे़ हे झाड कोसळल्यास नागरिकांचा बळी जाऊ शकतो़ येथे उभे राहणाऱ्या बेस्ट बसचे नुकसान होऊ शकते़ पालिकेने रेल्वे प्रशासनाला बजावलेल्या नोटीसनुसार, फोर्ट येथील बेस्ट बस स्थानकालगतच्या नगर चौकातील झाड कोसळण्याच्या अवस्थेत आहे. परिणामी दुर्घटना घडण्यापूर्वी सदर झाडाची छाटणी करण्यात यावी.

महत्त्वाचे म्हणजे या पत्रानुसार, झाडाच्या छाटणीसाठी अर्ज करावा. झाडाची छाटणी करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करावी. यात दिरंगाई झाल्यास दुर्घटनेस रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असेही पालिकेने म्हटले आहे.

Web Title: Prune the tree in a collapsed state