Join us  

एसटीच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना देखील ५० लाख विमा कवच द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 6:56 PM

महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)ची मागणी

 

मुंबई : एसटी महामंडळातील अत्यावश्यक बस सेवा देण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील कर्मचारी व अधिकारी रात्रदिवस काम करीत आहेत. परिणामी, मुंबई येथील एका अधिका-याला कोरोनाची लागण झाली. परिवहन मंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा कवच (सानुग्रह सहाय्य) देण्याची घोषणा नुकताच केली. मात्र, अधिका-यांना विमा लागू केला नसल्याने अधिका-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एसटी अधिकाऱ्यांना देखील ५० लाखांचा विमा देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजूरांना परराज्याच्या सीमेवर सोडणे, जिल्हा अंतर्गत वाहतुक करण्याचा राज्य सरकारच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाची बससेवा सुरु आहे. ही सेवा बजावताना कोरोनाशी संबंध येऊन एस.टी.कर्मचा-यांना, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्याना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. 

-------------- 

 परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घोषणेनंतर काढलेले परिपत्रकावर अधिकार नसलेल्या कंत्राटी  व्यक्तीची सही आहे. त्यामुळे हे परिपत्रक बेकायदेशीर आहे. महामंडळाने कर्मचारी आणि अधिकारी या दोन्हीचा समावेश करून ५० लाखांचा विमा कवच देण्यात यावा, अशी मागणी  संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे. 

--------------

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस